देशाचे मोठे उद्योगपती मुकेन अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा नुकताच प्री-वेडिंग सोहळा पार पडला. १ मार्च ते ३ मार्च असा तीन दिवसांचा हा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. सध्या या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. अशातच राखी सावंतने अंबानींनी या प्री-वेडिंग सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राखी सावंत म्हणते, “अंबानी नमस्कार, तुम्ही मला प्री-वेडिंग सोहळ्याला का नाही बोलावलं? तुम्हाला माहितीये, मला जर तुम्ही बोलावलं असतं तर मी मंच, खुर्च्या तोडल्या असत्या. अंबानीजी तुम्ही अजून माझा डान्स पाहिला नाही. रिहाना, अॅकॉन अशा लोकांना तुम्ही का बोलावलं? हे माझ्यासमोर शेंगा आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिलाय, ‘मुन्नी बदनाम’, ‘परदेसिया’ एवढी गाणी मी केली तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही? हजार कोटी देऊन तुम्ही यांना बोलावलं. तरीही रिहाना फाटलेल्या कपड्यांमध्ये आली अंबानीजी. मी जर आली असती तर हॉट आणि सेक्सी कपडे घालून आली असती. माझ्या कपड्यांनी मी तुमचा स्टेज पुसला असता.”
हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: मुक्ता-सागरचा रोमान्स सुरू असतानाच घरच्यांची एन्ट्री अन् मग…; नेमकं काय घडणार? जाणून घ्या…
“मला बोलवण्याचे चार फायदे होते. मी मनोरंजन केलं असतं, डान्स केला असता, तुमचे जितके पाहुणे आले होते त्यांचं जेवून झाल्यानंतर सर्व भांडी घासली असती. सर्वांच्या खोल्या साफ केल्या असत्या. मी काय केलं नसतं. तुम्ही हजार कोटी खर्च करून कोणाला बोलावलं? अरे तुम्ही राखी सावंतला बोलावलं नाही. हे तुम्ही काय केलं?”, असं राखी सावंत म्हणाली.
दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले.
हेही वाचा – Video: नीता अंबानींनी लेक ईशासह केलेला सुंदर परफॉर्मन्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल
तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली.