बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. कधी कधी तिच्या लूकमुळे तर कधी विचित्र कृतीमुळे ती चर्चेत असतेच. अशातच राखीने जिया खान आत्महत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राखीच्या प्रतिक्रियेनंतर सगळीकडे तिच्याच वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- सलमान खानने अनेक कलाकारांचं करिअर केलंय उद्ध्वस्त? भाईजान म्हणाला, “मी जेव्हा दारू पितो…”

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा १० वर्षांनंतर विशेष सीबीआय कोर्टाने निकाल दिला. अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अखेर सीबीआय न्यायालयाने या प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. त्याने आत्महत्या करण्यापासून रोखून अनेकदा जियाचे प्राण वाचवले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आता अभिनेत्री राखी सावंतने पापाराझीशी बोलताना जिया खान प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- दिवसभरात १०० सिगारेट ओढायचे शम्मी कपूर; एकदा मॉरिशसला गेले अन्…

व्हिडीओमध्ये राखी ‘सूरज पांचोली माझा भाऊ आहे’ असे म्हणताना दिसत आहे. राखी म्हणाली, ‘हे न्यायालयीन प्रकरण आहे. वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला माहीत नाही? पण जिया खानच्या मृत्यूबद्दल मला दु:ख आहे. पणंआजकाल मुलींना काय झालेय माहीत नाही. प्रत्येक मुलगी प्रेमात असते. माझ्याबरोबरही असे झाले. माझ्याबरोबरही शोकांतिका घडली. पण मी सगळे विसरून हसतेय. कारण आयुष्य एकदाच मिळते. पुनःपुन्हा मिळत नाही. म्हणूनच कुणाच्या प्रेमात ते संपवू नये. मग तो मुलगा असो की मुलगी. ‘मला समजत नाही की मुली प्रेमात आत्महत्या का करतात? एक गेला तर काय झालं, दोन-चार परत येतील की नाही? असेही राखी म्हणाली.

राखी नुकतीच ‘इंडियन आयडॉल’ स्पर्धक मोहम्मद दानिशच्या लग्नात पोहचली होती. या वेळी राखीने नवऱ्या मुलीसारखी वेषभूषा केली होती. राखीला या वेशभूषेमागचे कारण विचारताच तिने दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राखी म्हणाली, ”मी नवरा मिळेल या आशेने प्रत्येक लग्नात नवरीमुलीप्रमाणे कपडे घालून जाते.” राखीच्या या उत्तरानंतर सगळीकडे तिचीच चर्चा सुरू होती.