बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका चोप्राने नुकतंच बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केले आहे. मी या राजकारणाला कंटाळूनच हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे प्रियांका चोप्रा म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर सिनेसृष्टीवर विवेक अग्निहोत्री, कंगना रणौत, गायक अमाल मलिक या लोकांनी प्रियांकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंतने मात्र प्रियांकाच्या या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्राने नुकतंच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने बॉलिवूडवर अनेक आरोप केले होते. नुकतंच याबद्दल अभिनेत्री राखी सावंतला विचारणा करण्यात आली. त्यावर राखीने “मी बॉलिवूडला कधीच बदनाम करणार नाही”, असे ठामपणे सांगितले. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
आणखी वाचा : “चांगल्या कामासाठी काही लोकांना आकर्षित…” बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

“प्रियांका चोप्राने बॉलिवूडबद्दल जे काही सांगितलंय, तितक काही सिनेसृष्टीत होत नाही. देव तुमचे नशीब लिहून पाठवतो आणि तुमच्या नशिबात जे असते ते तुम्हाला मिळते. त्यासाठी मेहनत करावी लागते. स्वत:ला फिट ठेवावं लागतं. मी अनेकदा पडलीय, पण तरीही स्वत:च्या पायावर उभी राहिली.

पण आता जर मी संपूर्ण मलई खाऊन दुसऱ्या ठिकाणी जात असेन तर मी माझ्या बॉलिवूडला कधीच बदनाम करणार नाही. कारण माझ्या बॉलिवूडने मला नाव दिले आहे. ती माझी कर्मभूमी आहे. त्याने मला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. मला कोण काय बोलतं याबद्दल काहीही घेणं देणं नाही”, असे राखी सावंत म्हणाली.

प्रियांका चोप्रा काय म्हणाली होती?

“मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला ‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्यने एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिल्यावर फोन केला होता. त्यावेळी मी ‘सात खून माफ’ची शूटिंग करत होते. तिने मला अमेरिकेत म्युझिक करिअर करण्यात तुला रस आहे का, असा प्रश्न विचारला. मी बॉलिवूडमधूल काढता पाय घेण्याच्या तयारीत होते.

मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता.” असे प्रियांका म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant reacts to priyanka chopra statement about politics against her in bollywood see video nrp