राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या संसारात वादळ निर्माण झालं आहे. राखीशी लग्न केल्यानंतर तिचा पती आदिल खान दुसऱ्या एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, तो राखीला मारहाणही करायचा अशी राखीने तक्रार केली होती. राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशाविरा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आता आदिल १४ दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे. आता राखीने आदिलबद्द्ल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

आदिल विरुद्ध तक्रार केल्यानंतर राखी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल तसंच आदिलबद्दल राखी नवनवीन खुलासे करत आहे. दोन दिवसांपूर्वीच राखी सावंतच्या भावाने आदिलने राखीला मारहाण केल्यानंतरच्या तिच्या शरीरावरील जखमांचा फोटो आऊट केला होता. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तर त्यापाठोपाठ आदिलने राखीकडून पैसे घेतल्याचंही राखीने सांगितलं होतं. त्यानंतर आता आदिलने तिचे न्यूड व्हिडीओ विकले असा खुलासा राखीने केला आहे.

Ashish Shelar On Saif Ali Khan Attack
Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य

आणखी वाचा : राखी सावंतचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानने केली मध्यस्थी, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्याने आदिलला…”

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “आदिलने मला फसवलंय. त्याने माझे न्यूड व्हिडीओ काढले आणि ते काही लोकांना विकले. आता हे प्रकरण सायबर क्राईम विभागाकडे आहे.” त्याचप्रमाणे आमच्या लग्नानंतर आदिलने तनुशी अफेअर केलं आणि ती दोघं लग्न करण्याचा विचार करत आहेत असा खुलासाही राखीने केला. आता राखीच्या या बोलण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेही वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

दरम्यान मे २०२२ मध्ये राखी सावंत आणि आदिल खान यांनी लग्न केलं होतं. अनेक महिने ती दोघं विवाहबद्ध असल्याचं त्यांनी लपवलं होतं. गेल्या महिन्यातच राखीने आदिलशी लग्न केल्याचे जाहीर केलं. तर आता राखीने आदिलपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader