अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. गेल्या काही काळापासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होत्या. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः या वृत्ताची पुष्टी केली आहे. आईच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आईच्या निधनानंतर राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. नुकतंच तिने तिला अनाथ वाटत असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राखी सावंत ही आईच्या अंत्यसंस्कारानंतर रडताना दिसत आहे. या व्हिडीओत तिने आईच्या निधनानंतर तिला काय वाटते, याबद्दल सांगितले आहे. यावेळी ती भावूक झाली.
आणखी वाचा- Rakhi Sawant Mother Died : अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राखी म्हणाली, “आईचे ऋण कधीही फेडले जाऊ शकत नाही. मी माझ्या कातड्याचे जोडे जरी तिला शिवून दिले तरी ते कमीच पडतील. माझ्या आईने इतक्या मोठ्या जगात मला मोठं केलं, तसेच नाव मिळवून दिले, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. ती माझ्या बरोबर होती म्हणूनच आज मी राखी सावंत बनू शकले.

माझ्या वडिलांच्या कुटुंबातील सर्वांचाच माझ्या अभिनेत्री बनायला विरोध होता. पण मी माझ्या आईमुळेच या क्षेत्रात आहे. पण आज आई गेल्यामुळे मला स्वत:ला अनाथ असल्यासारखे वाटत आहे. माझी आई-बाबा कोणीही या जगात नाही. माझ्या आईला नेहमी वाटायचे की मी चांगले काम करावे, आयुष्यात कायम पुढे जावे. लोकांची सेवा करावी. आदिलबरोबर माझा संसार सुरु करावा”, असे राखीने म्हटले.

आणखी वाचा- आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

दरम्यान राखी सावंतच्या आई जया या गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (२८ जानेवारी) रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant said my mother support me to become actress reveled after death nrp