अभिनेत्री राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यात वाद झाला आहे. राखीच्या आईच्या निधनानंतर दोघांमधील वादामुळे ते सातत्याने चर्चेत आहेत. आदिलने मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत राखीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आदिलला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अशातच राखीने एक नवीन रील व्हिडीओ शेअर केला आहे.
“तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य
या व्हिडीओमध्ये राखी काही ओळींवर लिपसिंक करताना दिसत आहे. या रीलमधून तिने तिच्यावर आता ओढवलेल्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “माझ्या जवळच्याच लोकांनी मला खूप एकटं पाडलं, त्यामुळे नक्की माझं नशीब वाईट आहे की मी, हेच मला कळत नाही,” अशा त्या ओळी आहेत. यामध्ये राखी लाल रंगाचा ड्रेस व काळ्या रंगाचा स्कार्फ घेऊन दिसत आहे.
राखीच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्स करून तिला हिंमत ठेवण्यास सांगत आहेत. ‘राखी तू खूप चांगली आहेस, पण तुझं नशीब खराब आहे’, ‘राखी हिंमत ठेव, सगळं ठिक होईल’, अशा कमेंट्स तिचे चाहते करत आहेत.