अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. पती आदिल खानने फसवणूक केल्याचं राखीचं म्हणणं आहे.पतीविरोधात तक्रार केल्यानंतर राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आदिल खानबरोबरचा बेडरुममधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी व आदिल रोमान्स करताना दिसत आहेत. आदिल राखीला किस करत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये राखीने तुटलेले हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. राखी व आदिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांची हजेरी, फोटो व्हायरल

हेही पाहा>>रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीच्या नेकलेसची चर्चा, नेटकरी म्हणाले “कुंकू आणि मंगळसूत्र…”

राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओनवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “तुझा ड्रामा आता बघवत नाही. त्यामुळे अनफॉलो करत आहे”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “हा व्हिडीओ पोस्ट करण्याचा काय उद्देश आहे” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “राखीला वेड लागलं आहे”, अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. “याचा अर्थ तू अजूनही आदिलला विसरू शकली नाहीस” असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करुन तो…” आदिल खानबाबत राखी सावंतचा खुलासा, पतीवर असलेल्या बलात्काराच्या आरोपाचाही केला उल्लेख

राखीने पती आदिल खानविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला ७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. आता तो १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. राखीने आदिलवर फसवणूक, मारहाण व पैसे चोरल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आदिलची गर्लफ्रेंड तनु चंडेल गरोदर असल्याचं वृत्त आहे. तर आदिलवर एका इराणी महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

Story img Loader