बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज आई झाली आहे. आलियाने काही तासांपूर्वी गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. या बातमीमुळे कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर आई-बाबा झाल्याचे कळताच त्यांचे चाहतेही फार खूश झाले आहेत. त्यांच्यावर चाहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच बॉलिवूडची ड्रम क्वीन राखी सावंत हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आलिया आणि रणबीर आपल्या लेकीचे ‘हे’ नाव ठेवणार?, लग्नाआधीच अभिनेत्रीने केला होता खुलासा

आलिया भट्ट आई झाल्याचा राखी सावंतला अत्यानंद झाला असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. तव्यावर चमचा वाजवत “घरी लक्ष्मी आली आहे” असं म्हणत ती आलियाच्या मुलीचे स्वागत करत आहेत. तसेच तिचा बॉयफ्रेंड आदिलच्या हातात मिठाईचा बॉक्सही दिसत आहे. राखी सावंतचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत काहींनी तिला ट्रोल केलं आहे तर काहीजण तिच्या आनंदात सहभागी झाले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तव्यावर चमचा वाजवत राखी “लक्ष्मी आली, घरी लक्ष्मी आली आहे,” असं म्हणाली. नंतर आदिलच्या हातातून मिठाईचा बॉक्स घेत त्यातील एक बर्फीचा तुकडा कॅमेऱ्यासमोर धरत “आलियाला आज मुलगी झाली आहे. आलिया, ही घे मिठाई. तुम्हा सर्वांसाठीही ही मिठाई आहे. आज अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या दिवसाची गेले अनेक महिने आपण वाट पाहिली आणि अखेर आज तो दिवस आला. आलिया आज आई झाली आणि तिने एका गोंडस परीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर आई-बाबा झाले. तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन, नितूजी आणि संपूर्ण कपूर परिवाराचे अभिनंदन,” असं म्हणत तिने तिचा आनंद व्यक्त केला. या व्हिडीओच्या शेवटी तिने स्वतःही ती बर्फी खाल्ली. राखीबरोबरच या व्हिडीओमध्ये आदिलनेही आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : “मी समाजसेविका आहे आणि…”; राखी सावंतने साजिद खानवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठवला आवाज

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही महिन्यांपूर्वी ते आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली. त्या दिवसापासून ते दोघेही खूप चर्चेत आहेत. आलिया भट्टच्या बाळासाठी कपूर कुटुंबियाप्रमाणेच तिचे चाहतेही प्रचंड उत्सुक होते. गेल्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. काही दिवसांपूर्वी आलियाच्या प्रसूतीची तारीख समोर आली होती. येत्या नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ती बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यापूर्वीच आलिया भट्ट ही रुग्णालयात दाखल झाली आणि आज तिने गोड बातमी दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant shared sweets with aalia bhatt through a video rnv