अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचं राखीने उघड केलं होतं. त्यानंतर आदिलविरोधात गुन्हा दाखल करत त्याने फसवणूक व मारहाण केल्याचा आरोप राखीने केला होता. आता पुन्हा राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.
राखीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखीने गरोदर असल्याचं म्हटलं होतं. याबाबत खुलासा करत नंतर गर्भपात झाल्याचंही तिने सांगितलं आहे. राखी म्हणाली, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझा गर्भपात झाला. याबाबतही कुणाशी वाच्यता करू नको, असं आदिलने सांगितलं होतं. गर्भपात झाल्यानंतर तीन महिने शरीरसंबंध ठेवू नका, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण १० दिवसांतच आदिलने माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवले”.
हेही वाचा>> “बिग बॉसच्या घरात नमाज…” इन्स्टा लाइव्हमध्ये विजेत्या रॅपर एमसी स्टॅनचं वक्तव्य
हेही पाहा>> आंदोलनातील पहिली भेट अन्…; समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदच्या प्रेमात स्वरा भास्कर कशी पडली?
“गर्भपात झाल्यानंतर जर लगेच गरोदर राहिले तर माझ्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले होते. बिग बॉसच्या घरात असतानाही मी गरोदर असल्याचं म्हटलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर माझी आई आजारी असल्याचं मला कळलं. त्यानंतर आदिलबरोबर लग्न केल्याचा मी खुलासा केला. आदिलने लग्न झाल्याचंही मान्य केलं नव्हतं. या सगळ्या तणावामुळे माझा गर्भपात झाला”, असा खुलासा राखीने केला आहे.
हेही वाचा>> स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट, म्हणाले “फहाद अहमद…”
राखीने आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ७ फेब्रुवारीला त्याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला पुन्हा आदिलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आता आदिल २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे.