मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानविरोधात फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. राखीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पतीवर आरोप केल्यानंतर राखी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राखीने आदिलला घटस्फोट देणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता राखीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने तिहेरी तलाक रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. राखी म्हणाली, “मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करू शकतो, असं आदिल म्हणत असेल. पण मुस्लीम कायदाही आदिलला एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी देत नाही”.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला लॉटरी; अ‍ॅमेझॉनसह मिळाल्या २० ब्रँडच्या ऑफर

हेही पाहा>> आंदोलनातील पहिली भेट अन्…; समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदच्या प्रेमात स्वरा भास्कर कशी पडली?

“आदिलने माझ्याशी फक्त निकाह केला असता, तरीही तो मला घटस्फोट देऊ शकला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक रद्द केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. जुग जुग जिओ मोदीजी. सगळ्या मुस्लीम महिलांचा तुम्हाला सलाम. तिहेरी तलाकची मलाही एक दिवस गरज लागेल, असं मला वाटलं नव्हतं. जर माझ्या नवऱ्याने अशा पद्धतीने मला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला तर याबाबत पुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे मला घटस्फोट न देणं, हे आदिलच्या हिताचं आहे”, असं राखी म्हणाली आहे.

हेही वाचा>> Video: “पिक्चर अभी बाकी है” कोर्ट मॅरेज, साखरपुड्यानंतर आता स्वरा भास्करची लगीनघाई, म्हणाली…

राखीने पती आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ओशिवारा पोलिसांनी ७ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी (१६ फेब्रुवारी) आदिलला पुन्हा अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत आदिल पोलीस कोठडीत असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant thanks pm modi for triple talak over divorec news with husband adil khan kak