बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली आहे. त्या दोघांच्या नात्यात कटुता आली असून आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीचा पती आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. आता आदिलचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आदिल हा राखीला तिचे पैसे परत देण्याबद्दल बोलताना दिसत आहे.
नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी ही आदिलकडून तिने दिलेले पैसे परत मागताना दिसत आहे. यात आदिल हा बेडवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी राखी आदिलला “मी तुला जे दीड कोटी रुपये दिले आहे, ते तू परत कधी देत आहेस”, असे विचारताना दिसत आहे. त्यावर आदिल हा ‘४ महिने’ असं म्हणतो.
आणखी वाचा : राखी सावंतने आदिलची मारहाण का सहन केली? खुलासा करत म्हणाली “माझ्या आईमुळे…”
यावर राखी “चार महिन्यांनी तू मला नक्की पैसे परत करणार का?” असे विचारते. त्यावर तो “हो नक्की करेन”, असे म्हणतो. “तू मला चार महिन्यात फक्त माझे दीड कोटी दे, मला त्यातून मिळालेला नफा नको. तो तू तुझ्याकडेच ठेव”, असे राखी आदिलला सांगते.
त्यावर आदिल “हा आपण मिळालेला नफाही दोघात विभागून घेऊ”, असं म्हणतो. यावेळी राखी म्हणते की, “मला त्यातून मिळालेला नफ्याचा एकही रुपया नको. मला फक्त आणि फक्त मी मेहनतीच्या कमाईने मिळवलेले पैसे हवे आहेत. ते पैसे मी चुकीच्या मार्गाने मिळवलेले नाही. मी माझे दागिने मोडून तुला पैसे दिले आहेत.” यानंतर राखी ढसाढसा रडू लागते.
आणखी वाचा : “तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य
दरम्यान, राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यात वाद झाला आहे. आधी लग्न स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आदिल खानने नंतर मारहाण केल्याचे आरोप राखीने केले, तसेच त्याचे अफेअर असल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर मारायला घरी आलेल्या आदिलबद्दल तिने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आदिल खानला अटक झाली. त्यानंतर त्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आदिलमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं असल्याचं राखी सातत्याने म्हणत आहे. शिवाय आईच्या निधनाला जबाबदार आदिल असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता या दोघांमधील वाद आणखीन किती वाढणार? हे येत्या काही दिवसांमध्येच उघड होईल.