ड्रामा क्वीन राखी सावंत मध्यंतरी पाकिस्तानी अभिनेता डोडी खानशी लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत तिने स्वत: घोषणा करत माहिती दिली होती. पण, यानंतर डोडीने राखीशी लग्न करण्यास नकार देत तिची माफीही मागितली होती. यानंतर, आता राखी आणि डोडी खान यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. डोडी आणि राखी यांनी आपल्या मित्रमंडळींसह भारत विरुद्ध पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पाहिला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत ६ विकेट्सने विजय मिळवला. याशिवाय शेवटच्या चेंडूवर विराट कोहलीने विजयी चौकार लगावत आपलं ५१ वं वनडे शतक देखील पूर्ण केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राखी सावंत हा सामना सुरू असताना सुरुवातीला, “मी भारताची मुलगी आणि पाकिस्तानची होणारी सून” असं म्हणत दोन्ही संघांना पाठिंबा देत होती. तिने या सामन्यादरम्यान दोन्ही संघांना पाठिंबा दर्शवणारी अजब जर्सी घातली होती. या व्हिडीओमध्ये राखी दोन-तीन वेळा “मी पाकिस्तानची भावी सून आहे” असं म्हणताना दिसतेय.

राखी आणखी एका व्हिडीओमध्ये डोडी खानला म्हणाली, “कोहली मार रहा है तुम लोगों को गोली…” यावर तो म्हणाला, “अभी वही गोली हम उसको देंगे। आउट होगा वो.” यानंतर कोहलीचं शानदार शतक होतं आणि भारतीय संघ हा सामना जिंकतो.

टीम इंडिया जिंकल्यानंतर राखी सावंतने डोडी खानची चांगलीच खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “कोहली ने धोया है, तुम्ही नाराज आहात का?” यावर डोडी खान म्हणतो, “भारतीय संघ खूप चांगला खेळलाय. आम्हाला आनंद आहे आणि कोहलीजी तुम्हाला सलाम” राखी या व्हिडीओमध्ये विराटच्या शतकाचं श्रेय त्याची पत्नी अनुष्का शर्माला देत होती.

राखीचे हे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ पाहून आणि विशेषत: राखीची जर्सी पाहून नेटकऱ्यांनी तिला कमेंट्समध्ये ट्रोल केलं आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानं त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे.