रकुल प्रीत सिंगने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या नवीन वर्षात तिच्या बॉलीवूड पदार्पणाला १० वर्षे पूर्ण होणार आहेत. वैयक्तिक आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून रकुल बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे आणि लवकरच हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने लग्नाच्या अधिकृत तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार ही लोकप्रिय जोडी फेब्रुवारी २०२४मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित असेल. अभिनेत्रीला हे लग्न खाजगी पद्धतीने करायचं असल्याने याबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या रकुल आणि जॅकी आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर बँकॉकमध्ये धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “दोन महिन्यांपासून डेंग्यू अन्…”, अमृता खानविलकरचा गंभीर आजारांशी सामना; म्हणाली, “खचून न जाता…”

रकुल प्रीत आणि जॅकीने सोशल मीडियावर ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. याशिवाय जॅकीच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास रोमँटिक फोटो शेअर करत होणाऱ्या नवऱ्याचं भरभरून कौतुक केलं होतं. यावरून त्यांच्या अनेक चाहत्यांनी दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा कमेंट्समध्ये सुरू केल्या होत्या.

हेही वाचा : ठरलं! शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे २०२४ मध्ये बांधणार लग्नगाठ; पाँडेचेरीतून शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रकुल प्रीत लवकरच कमाल हासन यांच्याबरोबर ‘इंडियन २’ चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे जॅकी भगनानीने ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.