बॉलीवूडमधील अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता, चित्रपट निर्माता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. थायलंडमधील बॅचलर पार्टीनंतर आता दोघही लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. याच महिन्यात २१ फेब्रुवारी रोजी दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. जॅकी भगनानीच्या लग्नघरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली असून अभिनेत्याच्या लग्नघराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नाच्या निमित्ताने रकुल आणि जॅकीने पर्यावरणाबद्दल एक उत्तम निर्णय घेतला आहे. रकुल आणि जॅकी इको फ्रेंडली लग्न करणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लग्न इको फ्रेंडली असावे याची रकुल आणि जॅकीने विशेष काळजी घेतली आहे. जोडप्याने आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्याय निवडला आहे. त्यांच्या लग्नात अजिबात फटाके फोडले जाणार नाहीत. याशिवाय दोन्ही कुटुंबांनी कोणालाही निमंत्रण पत्रिका दिलेली नाही. सर्व पाहुण्यांना या जोडप्याने ई-इन्व्हिटेशन पाठवलं आहे. लग्न समारंभानंतर हे जोडपं झाडं लावणार आहे.

हेही वाचा… बॉलीवूड कलाकारांनंतर रोहित शर्मानेही केलं ’12th फेल’चं कौतुक; विक्रांत मेस्सी प्रतिक्रिया देत म्हणाला…

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीचे लग्नापूर्वीचे समारंभ १९ फेब्रुवारीपासून सुरू होतील. या लग्नसोहळ्यासाठी रकुल आणि जॅकी सब्यसाची किंवा मनीष मल्होत्राच्या डिझाईन्सची निवड करू शकतात. या बॉलीवूड कपलच्या लग्नाचं ई-इन्व्हिटेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नाची थीम गुलाबी आणि निळ्या रंगाची असून २१ फेब्रुवारीला लग्न असल्याचं त्या कार्डवर नमूद केलेलं आहे.

दरम्यान रकुल आणि जॅकीने ऑक्टोंबर २०२१ मध्ये आपल्या नात्याचा खुलासा केला होता. दोघांच्या कामाबाबात सांगायचं झाल्यास, जॅकीच्या पुढील प्रोडक्शनमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakul preet singh and jackky bhagnani decided to have an eco friendly wedding without firecrackers and invitation cards dvr