Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding : बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा गोव्यात थाटामाटात पार पडला आहे. २१ फेब्रुवारीला दक्षिण गोव्यातील आलिशान हॉटेलमध्ये रकुल-जॅकीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकलं आहे.
रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या लग्नात वरुण धवन, राज कुंद्रा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
हेही वाचा : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘या’ चित्रपटाने मारली बाजी! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी…
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रकुल आणि जॅकी यांचा विवाहसोहळा दोन पद्धतीत पार पडला आहे. पंजाबी व सिंधी अशा दोन पद्धतीत त्यांनी लग्न केलं आहे. रकुल-जॅकीच्या लग्नाआधीच्या विधींना १९ फेब्रवारीपासून सुरुवात झाली होती. यानंतर गोव्याला लग्नासाठी रवाना होण्यापूर्वी या जोडप्याने एकत्र मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं होतं.
हेही वाचा : रकुल प्रीत-जॅकी भगनानी आज गोव्यात अडकणार बंधनात; एक नाही दोन पद्धतींनी करणार लग्न, कारण…
गोव्यात लग्नबंधनात अडकल्यावर आता रकुल व जॅकी लवकरच मुंबईत एका भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन करणार आहेत. आता अभिनेत्री लग्नाचे फोटो व विवाह सोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर केव्हा शेअर करणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.