अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता जॅकी भगनानी आज (२१ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू होती. गोव्यात समुद्रकिनारी दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार या लग्नात सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, काल (२१ फेब्रुवारीला) रकुल व जॅकीचा मेंदी व संगीत कार्यक्रम पार पडला. गोव्याच्या आयटीसी या आलिशान हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खास सजावट करण्यात आली होती. दरम्यान, याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा- “निर्मात्यांनी याचा गैरफायदा…” सुरुवातीच्या काळातील ‘सिरियल किसर’ या प्रतिमेबद्दल इमरान हाश्मी स्पष्टच बोलला

रकुल-जॅकी दोन पद्धतींनी करणार लग्न

हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, रकुल व जॅकी पंजाबी आणि सिंधी रीतीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. रकुल पंजाबी आहे. त्यामुळे दोघांचा विवाह ‘आनंद कारज’ (पंजाबी रीतीरिवाज)नुसार होईल. तसेच जॅकी हा सिंधी कुटुंबातील असल्यामुळे पंजाबी पद्धतीने लग्न केल्यानंतर हे जोडपे सिंधी रीतीरिवाजांनीही लग्न करणार आहेत. म्हणजे वधू तीन फेरे घेईल आणि नंतर वर उरलेले फेरे पूर्ण करील. प्रत्येक फेरीचे वेगळे महत्त्व आहे. लग्नानंतर दोघांनी पाहुण्यांसाठी पार्टीही आयोजित केली आहे.

रकुल व जॅकी पर्यावरणस्नेही पद्धतीने लग्न करणार आहेत. दोघांनी आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्यायाचा अवलंब केला आहे. लग्न समारंभानंतर हे जोडपे वृक्षारोपणही करणार आहेत. रकुल व जॅकीच्या कुटुंबीयांनी कोणत्याही पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका दिलेली नाही. दोघांनी नातेवाइकांपासून मित्र-परिवारापर्यंत प्रत्येकाला ई-इन्व्हिटेशन पाठविले होते.

हेही वाचा- वामिका अन् अकायच्या नावांचं विराट कोहली-अनुष्का शर्माच्या नावाशी आहे खास कनेक्शन, जाणून घ्या

लग्नानंतर रकुल-जॅकी हनिमूनला कुठे जाणार?

गोव्यात लग्न केल्यानंतर रकुल व जॅकी हनिमूनला कुठे जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल व जॅकीने लग्नानंतर हनिमूनला जाण्याची योजना रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण- व्यग्र वेळापत्रकामुळे दोघे लग्नानंतर काही दिवसांमध्येच कामावर परतणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakul preet singh and jackky bhagnani to have two weddings dpj