लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री रकुल प्रित सिंगनेही धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या व जॅकीच्या लग्नसोहळ्यातील एक खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुखचे भाऊ धिरज यांची पत्नी दिपशिखा ही रकुल प्रितची सख्खी नणंद आहे. रकुल व जॅकी यांचं फेब्रुवारी महिन्यात गोव्यात लग्न झालं. लग्नाच्या कार्यक्रमातील एक फोटो रकुलने शेअर केला आहे. या फोटोत रकुल व धिरज देशमुख डान्स करताना दिसत आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, येणारं वर्ष आनंदाचं जावो आणि या वर्षात तुम्हाला हवं ते सर्व मिळो,’ असं रकुलने या फोटोत धिरज देशमुखांना टॅग करत लिहिलं.

सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न

rakul preet singh post for dhiraj deshmukh
रकुल प्रीत सिंगने शेअर केलेली पोस्ट

रितेश देशमुखनेदेखील भावाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने इन्स्टाग्रामवर धिरज देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे.

रकुल व जॅकीचं लग्न २१ फेब्रुवारी रोजी गोव्यात झालं. मेहुण्याच्या लग्नासाठी धिरज देशमुख गोव्याला गेले होते. त्यांची पत्नी दिपशिखा व मुलं सर्वजण या लग्नासाठी काही दिवस गोव्यात होते. दिपशिखा ही जॅकी भगनानीची मोठी बहीण आहे. दिपशिखा बऱ्याचदा मुलं व रकुल यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसते. सुप्रसिद्ध गायक एड शीरन भारतात आला तेव्हा जॅकी व रकुलने दिपशिखा व तिच्या मुलांबरोबर कॉन्सर्टला हजेरी लावली होती.

Story img Loader