Aman Preet Singh Arrested: बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा (Rakul Preet Singh) भाऊ अमन प्रीत सिंगला पोलिसांनी अटक केली आहे. अमनसह इतर चार जणांना सोमवारी हैदराबाद पोलिसांनी एका कथित ड्रग्ज प्रकरणात अटक केली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेलंगणाच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने २.६ किलो कोकेन जप्त केले आहे. हे कोकेन हैदराबादला विक्रीसाठी आणले जात होते अशी विभागाला माहिती मिळाली. त्यानंतर अमनसह इतर आरोपींना अटक करण्यात आली.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पोलिसांच्या पथकाने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असून ३० संभाव्य ग्राहकांची ओळख पटवली आहे. तर, अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमन प्रीत सिंग, अनिकेथ रेड्डी, प्रसाद, मधुसूदन आणि निखिल दमन या पाच जणांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या पोलीस कोठडीत असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
पोलीस अधिकारी काय म्हणाले?
“आम्ही पाच जणांना पोलीस ठाण्यात आणलं आहे. युरिन चाचणीमध्ये ते सर्व पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून लवकरच वैद्यकीय तपासणीसाठी पाठवणार आहोत,” अशी माहिती सायबराबाद पोलिसांच्या राजेंद्र नगर झोनचे डीसीपी श्रीनिवास यांनी दिली.
अमन प्रीत सिंग काय करतो?
अमन हा अभिनेता होण्यासाठी सिनेसृष्टीत संघर्ष करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलं आहे. त्याला प्रवासाची खूप आवड आहे, असं त्याच्या सोशल मीडियावर दिसून येतं. अमनच्या अटकेबद्दल रकुल प्रीत किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, रकुल प्रीत सिंगला देखील २०२२ आणि २०२१ मध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. गेल्या वर्षीही या संदर्भात तपास यंत्रणेने तिचा जबाब नोंदवला होता. रकुलशिवाय राणा दग्गुबती, चार्मे कौर, नवदीप, रवी तेजा आणि पुरी जगन्नाथ यांनाही ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून ईडी अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत व सेवनाबाबत या प्रकरणाचा तपास करत आहे.