अभिनेत्री रकुल प्रीत सिंग व अभिनेता जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू होती. येत्या २१ फेब्रुवारीला दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये या दोघांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रकुल व जॅकी पर्यावरणस्नेही पद्धतीने लग्न करणार आहेत. दोघांनी आपल्या लग्नात नो-क्रॅकर पॉलिसी पर्यायाचा अवलंब केला आहे. लग्न समारंभानंतर हे जोडपे वृक्षारोपणही करणार आहे. रकुल व जॅकीला त्यांचे लग्न खास व लक्षात राहील अशा पद्धतीने करायचे होते. लग्नासाठी त्यांनी एका खास डेस्टिनेशनची निवड केली आहे. दक्षिण गोव्यातील आयटीसी (ITC) हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती आहे तुम्हाला माहिती आहे का?

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

साऊथ गोव्यात असलेले आलिशान आयटीसी हॉटेल एखाद्या सुंदर रिसॉर्टसारखे आहे. हे हॉटेल ४५ एकरमध्ये बांधले गेले असून, त्यात २४६ खोल्या आहेत. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, आयटीसी ग्रॅण्ड हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. हॉटेलच्या आत एक स्विमिंग पूल, बार, जिम, रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल आणि अनेक आलिशान खोल्या आहेत. भारत आणि इतर देशांतून गोव्याला भेट देण्यासाठी येणारे श्रीमंत लोक या हॉटेलमध्ये राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या भव्य लग्नासाठी ITC हॉटेलमध्ये जवळपास ३५ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत; जिथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र राहणार आहेत.

लग्नानंतर रकुल-जॅकी हनिमूनला कुठे जाणार

गोव्यात लग्न केल्यानंतर रकुल व जॅकी हनिमूनला कुठे जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल व जॅकीने लग्नानंतर हनिमूनला जाण्याची योजना रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण- व्यग्र वेळापत्रकामुळे दोघे लग्नानंतर काही दिवसांमध्येच कामावर परतणार आहेत.

हेही वाचा- वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ‘अ‍ॅनिमल’ फेम रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

ऑक्टोबर २०२१ मध्ये रकुल व जॅकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आपल्या रिलेशनशिपबाबत घोषणा केली होती. दोघांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, जॅकी लवकरच ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटात दिसणार आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर अक्षय कुमार टायगर श्रॉफ मुख्य भूमिकांमध्ये आहेत. तर रकुल प्रीत सिंग नीतेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती शूर्पणखाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाची; तर साऊथची सुपरस्टार साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे.

Story img Loader