रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन हे ६०० कोटींच्या घरात गेले असून लवकरच ७०० कोटींचा टप्पाही हा चित्रपट पार करणार आहे.
आणखी वाचा : “सनी देओल हरवलाय, शोधून आणणाऱ्यास मिळणार बक्षीस”; पंजाबमधील पोस्टरबाजीमागील नेमके कारण जाणून घ्या
चित्रपट जरी जबरदस्त कमाई करत असला तरी यावर प्रचंड टीकादेखील होत आहे. चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजनीदेखील यावर टीका केली असून काहींनी याचं कौतुक केलं आहे. अल्लू अर्जुनपासून राम गोपाल वर्मापर्यंत कित्येकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी तर खास रिव्यू शेअर करत चित्रपटावर भाष्य केलं होतं. हा चित्रपट कशाप्रकारे ढोंगी समाजाचा मुखवटा फाडतो यावर भाष्य केलं होतं.
याबरोबरच त्यांनी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचंही मनापासून कौतुक केलं. अशातच त्यांनी नुकतीच केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. ‘अॅनिमल’च्या पोस्टरवर रणबीर ऐवजी स्वतःचा चेहेरा लावून राम गोपाल वर्मा यांनी मूळ पोस्टर व एडिट केलेलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलं, “माझ्यातील या ‘अॅनिमल’च्या वाट्याला जाऊ नका, अन्यथा तो तुमचा फडशा पाडेल.”
काहींना राम गोपाल वर्मा यांचा अवतार प्रचंड आवडला आहे. तर काहींनी चित्रपटाबरोबरच त्याला प्रमोट करणाऱ्या राम गोपाल वर्मा यांच्यावरही टीका केल्याचं दिसून येत आहे. काहींनी राम गोपाल वर्मा यांच्या या पोस्टला ‘अनपेड पीआर’ असं म्हणत हिणवलं आहे. तर काहींनी राम गोपाल वर्मा यांनीच वांगा यांच्या आगामी ‘अॅनिमल पार्क’मध्ये व्हिलनच काम करावं असा प्रस्ताव ठेवला आहे. एकूणच राम गोपाल वर्मा यांना या पोस्टवरुन चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.
एकूणच या चित्रपटाबद्दल सेलिब्रिटीजमध्येसुद्धा दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.