Ram Gopal Varma on Malayalam Cinema: मल्याळम सिनेमात मागच्या काही वर्षात खूप वाढ झाली आहे. या इंडस्ट्रीने अनेक सुपरहिट व विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट दिले आहेत. अनेक मल्याळम चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुक केले, तर काहींनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. प्रादेशिक सिनेमे राज्याबाहेर जाऊन गाजतायत हे मल्याळम इंडस्ट्रीचं मोठं यश आहे. एकीकडे बॉलीवूड चित्रपट करोनानंतर अजूनही प्रेक्षकांना थिएटर्समध्ये आणण्यासाठी अजुनही धडपडत आहे, तर दुसरीकडे मल्याळम सिनेमाने एका मागे एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फक्त २०२४ बद्दल बोलायचं झाल्यास ‘प्रेमालू’, ‘ब्रह्मयुगम’, ‘आवेशम’, ‘आदुजीविथम’, ‘उल्लोझुक्कू’, ‘पॅराडाईज’, ‘अट्टम’, ‘मंजुम्मल बॉइज’ व ‘फॅमिली’ या वर्षात यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पृथ्वीराज सुकुरामन, फहाद फासिल, मामूटी, रोशन मॅथ्यू व अनेक मल्याळम कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत मल्याळम सिनेमात झालेल्या बदलांचे कौतुक केले. एकेकाळी फक्त अडल्ट कंटेंटसाठी ओळखली जाणारी मल्याळम इंडस्ट्री आता एक पॉवरहाऊस म्हणून उदयास आली आहे, जिथे जागतिक स्तरावर गाजणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे, असं ते म्हणाले.

“जॅकी श्रॉफ वाईट अभिनेता, तर शत्रुघ्न सिन्हा…”, निर्माते सुभाष घई यांचं स्पष्ट मत; शाहरुख खानबरोबरच्या भांडणाबद्दल म्हणाले…

“अशा काही अनपेक्षित चित्रपटांची गरज असते, जे एकामागून एक वेगाने येतात अन् सगळं बदलून टाकतात. एक काळ असा होता जेव्हा मल्याळम चित्रपट सेक्स असलेले चित्रपट म्हणून ओळखले जायचे. जेव्हा मी विजयवाडामध्ये इंजिनिअरिंग करत होतो, तेव्हा आम्ही मल्याळम चित्रपट बघायचोच नाही, कारण त्यात इतर कोणत्याही भाषेच्या चित्रपटांपेक्षा जास्त सेक्स सीन असायचे. आणि आता सर्वोत्कृष्ट चित्रपट मल्याळम इंडस्ट्रीमधून येत आहेत. त्याकाळी त्यांचे चित्रपट चांगले नव्हते असं नाही, पण त्याकाळी वितरक चित्रपट कदाचित वेगळ्या कारणाने आणायचे. बऱ्याच गोष्टी यासाठी कारणीभूत असतात,” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

मल्याळम सिनेमाच्या यशाबद्दल राम गोपाल वर्मा यांचे विधान (फोटो – सोशल मीडिया)

हेडफोनशिवाय बघू नका OTT वरील ‘हे’ चित्रपट, बोल्ड कंटेटचा आहे भडीमार

येत्या १० वर्षात भारतीय सिनेसृष्टीचं भविष्य काय असेल असं विचारल्यावर ते म्हणाले की आता सगळं इतकं वेगाने बदलत आहे की येत्या सहा महिन्यांत काय घडेल ते सांगणंही कठीण आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma says once malayalam cinema meant sex films now their movies resonate globally hrc