कॉमेडियन कपिल शर्माचा शो खूप प्रसिद्ध आहे. अनेक कलाकार आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आणि मुलाखतींसाठी या शोमध्ये येतात. काही दिवसांपूर्वी कपिलच्या शोमध्ये ९० च्या दशकातील तीन सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मंदाकिनी आणि संगीता बिजलानी सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनी यांनी आपल्या वडिलांबाबत एक किस्सा शेअर केला आहे.
हेही वाचा- Video: हातात पांढरी उशी घेऊन जान्हवी कपूर पोहोचली विमानतळावर; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “चोर…”
‘द कपिल शर्मा शो’मध्ये मंदाकिनीने सांगितले की, ‘माझ्या वडिलांनी मझ्यावर गोळी झाडली आहे, अशी चर्चा सुरू होती.’ या अफवेबद्दलचा किस्सा सांगताना मंदाकिनी म्हणाल्या, ‘माझ्या वडिलांनी मला गोळी मारल्याची बातमी पसरली होती. मी सेटवर पोहोचल्यावर सगळे माझ्याकडे आले. मला लोक विचारत होते की, मी ठीक आहे का? ते सगळे माझी इतकी चिंता का करत होते हे मला कळले नाही आणि नंतर मला ही अफवा पसरल्याचे कळले.’
कपिलने मंदाकिनींना त्यांचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’बाबत प्रश्न विचारला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. त्यामध्ये राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर प्रमुख भूमिकेत होता. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये मंदाकिनी यांनी बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता.
हेही वाचा- अखेर ‘द केरला स्टोरी’ पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित; कसा आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद? घ्या जाणून
जून महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’चा शेवटचा भाग प्रसारित होईल. त्यानंतर हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद राहील, असे म्हटले जात होते. हा शो खरेच बंद होणार आहे का? यावर कपिलनेच प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्मा म्हणाला, “अजून याबाबत काहीही निश्चित झालेले नाही. आम्हाला जुलै महिन्यात आमच्या एका लाइव्ह शोसाठी अमेरिकेला जायचे आहे आणि तेव्हा ठरवले जाईल की त्या वेळी काय करायचे? त्यामुळे याविषयी काहीही बोलण्यासाठी अजून खूप वेळ आहे.”