९०च्या दशकातील ‘रामायण’ ही टीव्ही मालिका प्रचंड गाजली. रामानंद सागर दिग्दर्शित या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलीया यांनी सीता मातेची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. दीपिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी क्रिती सेनॉनशी त्यांच्याशी तुलना केली आहे.
दीपिका चिखलीया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भगव्या रंगाची साडी नेसून सीता मातेचा लूक केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी राम सीया राम हे गाणंही दिलं आहे. दीपिका चिखलीया यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील क्रिती सेनॉनला सीता मातेच्या लूकवरुन ट्रोल केलं आहे.
“तुमची एक रील आदिपुरुष चित्रपटावर भारी पडेल,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “आजकाल अभ्रद लोक सीता मातेची भूमिका साकारत आहेत,” असंही म्हटलं आहे.
“ही सीता माता खरी वाटते”, अशी कमेंटही केली आहे. “तुम्ही सीता मातेचा खरा चेहरा आहात,” असंही म्हटलं आहे.
“तुमच्या व्यतिरिक्त सीता मातेच्या भूमिकेत कोणीही चांगलं दिसत नाही”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ १६ जूनला प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर टीका होत आहे. असं असलं तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे