योगगुरु रामदेव बाबा हे नेहमीच विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतंच उत्तरप्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी आर्यवीर महासंम्मेलन पार पडले. यावेळी रामदेव बाबांनी व्यसनमुक्ती या विषयावर भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या कलाकरांसह बॉलिवूडकरांवर निशाणा साधला. सध्या संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

‘दैनिस भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, योगगुरु रामदेव बाबा यांनी भाषण करतेवेळी बॉलिवूडवर निशाणा साधला. व्यसनमुक्ती या विषयावर बोलताना त्यांनी याचा संबंध थेट बॉलिवूडशी जोडला आहे. रामदेव बाबा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना ड्रग्जवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सुरुवातीपासूनच बॉलिवूडवर टीका करण्यास सुरुवात केली.

badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
RSS chief Mohan Bhagwat statement regarding Ram temple
‘राम मंदिर निर्मिती झाली, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Sameer Wankhede on Aryan Khan case calls Shah Rukh Jawan dialogues cheap
“करिअरमधील सर्वात लहान प्रकरण”, समीर वानखेडेंचे आर्यन खानबद्दल वक्तव्य; शाहरुखच्या डायलॉगबद्दल म्हणाले, “थर्ड क्लास…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा
Shatrughan Sinha slams Mukesh Khanna
“हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”
varun dhawan on amit shah
“अमित शाह देशाचे हनुमान”, वरुण धवनने गृहमंत्र्यांचं केलं कौतुक अन् विचारला प्रश्न; म्हणाला, “राम आणि रावण…”
ram gopal varma on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलंगणा सरकारने मुद्दाम…”

आणखी वाचा : ‘हॅरी पॉटर’ फेम रॉबी कॉलट्रेन यांना आधीच लागली मृत्यूची चाहूल? म्हणाले होते, “पुढील ५० वर्षांनी मी नसेन पण…”

“सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार ड्रग्सचे सेवन करत आहेत. सध्या सर्व सिनेसृष्टी, बॉलिवूड हे ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. यापूर्वी सलमान खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला होता, याची तुम्हाला कल्पना असेलच. या प्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते, असे रामदेव बाबा म्हणाले. मात्र यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सलमान खान नाही तर शाहरुखचा मुलगा तुरुंगात गेला होता,” असे सांगितल्यावर त्यांनी त्यात सुधारणा केली.

यापुढे ते म्हणाले, “शाहरुखच्या मुलाला ड्रग्ज घेताना पकडले होते. सलमानही ड्रग्ज घेतो. मला आमिर खान ड्रग्ज घेतो की नाही याबद्दल माहिती नाही. पण सध्या संपूर्ण बॉलिवूडच ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. इतर बॉलिवूडमधील कलाकार याचे सेवन करतात का याबद्दल देवालाच ठाऊक. पण लोकांनी अशाप्रकारच्या अंमली पदार्थांपासून दूर राहायला हवे. त्याचे सेवन करु नये,” असेही आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच होणार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात टक्कर, जाणून घ्या कारण

“संपूर्ण भारत भूमी ही ऋषीमुनींची भूमी आहे. तेव्हा सगळ्यांनी अंमली पदार्थांपासून शक्य तितके दूर राहावे. यामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे,” असेही रामदेव बाबा म्हणाले. आर्यवीर महासंमेलनात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपास्थित होते.

रामदेव बाबा यांनी यापूर्वीही अनेकदा बॉलिवूडवर टीका केली आहे. याआधीही अनेकदा त्यांनी अनेक कलाकारांनी नाव घेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी बॉलिवूड कलाकार आणि ड्रग्ज याबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज हा विषय चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader