रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर नेहमी चर्चेत असते. गेल्या वर्षी ख्रिसमसला रणबीर व आलियाने राहाला सगळ्यांसमोर आणलं. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी करीना कपूरचा मुलगा जेहच्या वाढदिवसातील राहाचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. अशातच आलियाचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नात कोणासारखी दिसते? याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर व आलियाच्या लेकीचा चेहरा समोर आल्यापासून कोणी राहा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते म्हणत आहेत. तर कोणी रणबीर सारखी दिसते, असं म्हणत आहेत. पण महेश राहा ही भट्ट कुटुंबातील एका सदस्यासारखी दिसत असल्याचं म्हणाले.

हेही वाचा – “माझी नवीन गाणी पाठवतो…”, जॉन सीनाने गायलेलं ‘ते’ गाणं ऐकून शाहरुख खानची प्रतिक्रिया, म्हणाला…

दरम्यान, नुकताच महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक पूजा भट्ट हिचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने महेश यांनी पूजासाठी एक नोट लिहिली होती; जी आता पूजाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या नोटमध्ये महेश भट्ट यांनी लिहिलं आहे की, तुझा चेहरा हा आपल्या लाडक्या राहाशी जुळतो. तुमच्या दोघीत खूप साम्य आहे, याचं मला अनेकदा आश्चर्य वाटतं. दोघी देखील खूप निरागस आहात. माझ्या लाडक्या मुली तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

हेही वाचा – “वेगळं आणि खास तुमच्यासाठी…”, ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतल्यानंतर निलेश साबळेंचा प्लॅन बी समोर, म्हणाले…

महेश भट्ट यांनी पूजासाठी लिहिलेली ही नोट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. पूजा ही महेश भट्ट यांची पहिली मुलगी आहे. गेल्या वर्षी पूजा ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात झळकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir alia daughter raha kapoor exactly looks like pooja bhatt says mahesh bhatt reveals pps