बॉलीवूडचं रोमॅंटीक कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या अभिनयामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अशातच रणबीर आणि आलियाच ड्रीम हाऊस तयार होत आहे आणि या घरात लवकरच कपूर कुटूंबाची एन्ट्री होणार आहे.

रणबीर आणि आलियाचं वांद्रे येथे स्वप्नातलं घर तयार होत आहे. अनेकदा या बंगल्याच काम पाहण्यासाठी हे कपल तिथे दिसले आहेत. एका वर्षाच्या आधीपासून या बंगल्याचं बांधकाम सुरू होतं. यापूर्वी हा बंगला दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि त्यांची पत्नी कृष्णा राज यांच्या नावावर होता आणि कपूर कुटुंबातील एकुलता एक नातू असल्याने ही मालमत्ता रणबीरकडे जाते. आजही रणबीर कपूर बंगल्याबाहेर सुरू असलेल्या बांधकामाची सर्व तपासणी करताना दिसला. यावेळी आलिया भट्ट आणि नीतू कपूरही उपस्थित होते.

हेही वाचा… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने किती मानधन घेतलं? निर्माता खुलासा करत म्हणाला…

बॉलीवूड लाईफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलिया दोघांनीही त्यांचा आलिशान बंगला उभारण्यासाठी एकत्र पैसे गुंतवले आहेत. शाहरुख खानचा ‘मन्नत’ आणि अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ यांच्या तुलनेत रणबीरचा बंगला मुंबई परिसरातील सर्वात महागडा बंगला असेल. असंही म्हटलं जातंय की, रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूरच्या नावाने या बंगल्याचं नाव ठेवणार आहे. या भव्य बंगल्याबरोबरच आलिया आणि रणबीर या दोघांचे वांद्रे परिसरात ४ फ्लॅट असून त्यांची किंमत ६० कोटींहून अधिक आहे.

नीतू कपूर या बंगल्याच्या सह-मालक असतील कारण दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या सर्व मालमत्तेची अर्धी जबाबदारी नीतू यांच्याकडे सोपवली होती. नीतूजी स्वत: आर्थिकदृष्ट्या सबळ असल्याचे सांगून अलीकडेच त्यांनी वांद्रे परिसरातच १५ कोटींचे भव्य घर खरेदी केले आहे. बंगला तयार झाल्यानंतर संपूर्ण कपूर खानदान एकाच छताखाली एकत्र राहतील, असा अंदाज आहे.

हेही वाचा… हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

दरम्यान, रणबीर आणि आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘लव्ह अ‍ॅंड वॉर’ या आगामी चित्रपटात रणबीर झळकणार आहे. तर, ‘जिगरा’ या चित्रपटाद्वारे आलिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader