अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी या स्टार कपलने लग्नगाठ बांधली होती. यानंतर आलियाने ५ नोव्हेंबरला लेक राहाला जन्म दिला. गेल्या महिन्यात राहाने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. परंतु, गेली वर्षभर आलियाने लेकीचा कोणताच फोटो शेअर केला नव्हता. तसेच पापाराझींसमोर देखील राहाचा चेहरा दाखवला जात नसे. आज अखेर रणबीर-आलियाने त्यांच्या सगळ्या चाहत्यांना ख्रिसमसचं खास गिफ्ट दिलं आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने आज वर्षभराने पहिल्यांदाच रणबीर-आलियाने लेक राहाचा चेहरा पापाराझींसमोर दाखवला. यावेळी राहाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता आणि त्यावर खास ख्रिसमस ट्रीचं डिझाइन केलेलं होतं.
हेही वाचा : ‘अॅनिमल पार्क’मध्ये उपेंद्र लिमयेंची भूमिका असेल का? खुलासा करत म्हणाले, “माझं संदीपशी परवाच…”
आलिया-रणबीरने लेक राहाबरोबर पहिल्यांदाच पापाराझींना एकत्र पोज दिल्या. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यामध्ये राहा आलियासारखी दिसत असून, तिचे डोळे कपूर कुटुंबीयांप्रमाणे घारे असल्याचं पाहायला मिळत आहे.
राहाच्या या व्हिडीओवर “राहा खूपच गोड आहे”, “राहा आपल्या आजोबांसारखी दिसते”, “किती सुंदर” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवर राहाचा हा गोड व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आणल्याने आलिया-रणबीरच्या लाडक्या लेकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.