करीना-करिश्मा, रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन नुकताच लग्नबंधनात अडकला. २१ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात आदरने अलेखा आडवाणीशी हिंदू रिती-रिवाजात लग्न केलं. याआधी दोघांचं लग्न गोव्यात ख्रिश्चिन पद्धतीत झालं होतं. पण, त्यानंतर दोघांनी हिंदू परंपरेनुसार लग्नागाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आदर व अलेखाच्या लग्नसोहळ्याला कपूर कुटुंबासह बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. रिद्धिमा साहनी, रेखा, आकाश अंबानी-श्लोका मेहता, अनिल अंबानी, बोनी कपूर, निखिल नंदा, अगस्त्य नंदा, शाहरुख खान-गौरी खान, सुहाना खान, अनन्या पांडे असे मंडळी आदर व अलेखाच्या लग्नात पाहायला मिळाले होते. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, रणबीर कपूर व आलिया भट्टच्या एका कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. बॉलीवूडच्या या लाडक्या जोडप्याने नेमकं काय केलं? जाणून घ्या…

रणबीर कपूर व आलिया भट्टचा हा व्हायरल व्हिडीओ आदर व अलेखाच्या मेहंदी सोहळ्यातला आहे. या मेहंदी सोहळ्यामध्ये आलिया चांगलीच भाव खाऊ गेली होती. यावेळी तिने असा काही लूक केला होता, ज्यामुळे तिची खूप चर्चा झाली. आलियाने पिवळ्या रंगाचा भरजरी शरारा घातला होता. यावर तिने मोठे कानातले आणि न्यूड मेकअप केला होता. तसंच आलियाने हटके हेअरस्टाइल केली होती. तिने केसांची वेणी घातली होती, ज्यामध्ये निळ्या रंगाची रिबन होती. आलियाच्या याच हटके वेणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता सेटवर जॅकेट घातलं होतं.

मेहंदी सोहळ्यातील रणबीर व आलियाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघं कुटुंबातील मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेतला दिसत आहेत. रणबीर-आलिया प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन खाली वाकून त्यांच्या पाया पडताना पाहायला मिळत आहेत. दोघांच्या याच कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.

रणबीर-आलियाच्या या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सर्वात संस्कारी व नम्र जोडपं आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आलिया व रणबीर प्रत्येकांच्या पाया पडत आहेत, हे किती गोड आहे. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं,” याला संस्कार म्हणतात. आमची आलिया खूपच गोड आहे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आदर्श जोडपं.”

Comments
Comments

दरम्यान, रणबीर कपूर आलिया भट्ट २०२२मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला आलियाने राहाला जन्म दिला. दोघांनी वर्भभर राहाचा चेहरा लपवला. २०२३मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर व आलियाने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

Story img Loader