रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. नुकतंच या जोडप्याने त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी हजेरी लावून पाहणी केली. लवकरच रणबीर आणि अलिया त्यांची मुलगी राहा कपूर आणि कुटुंबासह या घरात राहायला येणार आहेत. अजूनपर्यंत या दोघांच्या कन्यारत्नाचा एकही फोटो बाहेर आलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच रणबीर आणि अलिया या दोघांनी मिळून मुंबईच्या पापाराझींची भेट घेतली आणि संगळ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. युय भेटीदरम्यान त्यांनी फोटोग्राफर्सना रहाचे फोटो न काढण्याची नम्र विनंती केली. एका ठराविक वयापर्यंत तिचे फोटो कोणीही काढू नये अशी अटच जणू या दोघांनी घातलेली आहे. मुलीच्या बाबतीतही ‘नो फोटो पॉलिसी’चं कायम ठेवण्याचा या दोघांचा निर्णय आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; ‘या’ मौल्यवान वस्तूसह मोलकरीण पसार

या सगळ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अखेर रणबीरने तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना मोबाइलमध्ये क्लिक केलेला राहाचा फोटो दाखवला. रणबीरच्या या कृतीचं तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी कौतुक केलं. पण रणबीर आणि आलिया या दोघांनी मात्र प्रत्येक पापाराझीची वैयक्तिक भेट घेऊन आपल्या मुलीचे फोटो काढून व्हायरल करू नये अशी विनंती केली आहे.

तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने याविषयी सांगितले, “रणबीर आणि अलिया हे बॉलिवूडमधलं एक उत्तम जोडपं आहे. त्यांनी आता जरी फोटो काढण्यास मनाई केली असली तरी योग्य वेळ येताच ते आम्हाला स्वतः फोटो काढण्यासाठी बोलवतील असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. सध्या रणबीर ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे तर आलियासुद्ध तिच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.