अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अखेर हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. तर त्यांच्या अनेक चाहत्यांनी फर्ट डे फर्स्ट शो पाहिला असून आता ते या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. परंतु प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. ट्रेलर पाहूनच त्यांच्यातली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. तर या चित्रपटाने रिलीजपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगधूनही चांगली कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलं कलेक्शन करेल असं सर्वांना वाटत आहे. पण आता यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

आणखी वाचा : रणबीर-श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट प्रदर्शनाआधीच हिट, कमावले ‘इतके’ कोटी

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. हा चित्रपट अनेक टोरेंट साइट्सवर एचडीमध्ये उपलब्ध झाला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये Filmyzilla, Movierulez, Telegram, Tamilrockers, 123movies अशा अनेक साईट्सवर लीक झाला आहे. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो.

हेही वाचा : श्रद्धा कपूरने सांगितलं उत्तम मराठी बोलता येण्यामागचं गुपित, म्हणाली, “कारण मी…”

‘तू झूठी में मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने टी दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Story img Loader