काल, २८ जानेवारीला गुजरातमध्ये ‘६९वा फिल्मफेअर अवॉर्ड २०२४’ जल्लोषात पार पडला. या अवॉर्ड शोला बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सिनेसृष्टीतील सर्वात मोठा हा अवॉर्ड शो दोन दिवस दिमाखात पार पडला. रणबीर कपूरला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला. तर आलिया भट्टला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला. तसेच ’12th फेल’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सध्या या अवॉर्ड शोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अ‍ॅनिमल’मधील रणविजय व झोया अर्थात रणबीर कपूर व तृप्ती डिमरीच्या रोमँटिक डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये ‘पहले भी मैं’ या गाण्यावर दोघं रोमँटिक डान्स करताना पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ ‘बॉलीवूड नाउ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: “हे खूप चुकीच आहे…”, Bigg Boss 17च्या निकालावर अंकिता लोखंडेची जाऊबाई नाराज, म्हणाली…

फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये रणबीर व तृप्ती व्यतिरिक्त इतर कलाकार मंडळींनी धमाकेदार डान्स केला. वरुण धवन, करिश्मा कपूर, करीना कपूर, आलिया भट्ट, मृणाल ठाकूर, कार्तिक आर्यन अशा अनेक कलाकारांनी जबरदस्त डान्स केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाद, अमृता खानविलकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

दरम्यान, रणबीर कपूर व तृप्ती डिमरीच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor and tripti dimri romantic dance in filmfare awards 2024 pps
Show comments