आलिया भट्ट ही तिच्या लग्नापासून चांगलीच चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच तिने ती आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली. तर दोन महिन्यांपूर्वीच तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आलिया आणि रणबीरने नुकतीच एका कॅलेंडर लॉन्चच्या इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी त्यांच्या कुटुंबीयांचेही फोटो लावण्यात आले होते. ते पाहून दोघेही खुश आहेत. या दरम्यानचे त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवाय सध्या रणबीर आणि अलिया त्यांच्या आगामी चित्रपटासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. हे दोघे काही काळ ब्रेक घेणार अशी चर्चा रंगली होती, पण आलियाने सध्या योगा करायला सुरुवात केली. तसंच रणबीरसुद्धा त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी म्हणजे या दोघांचे आगामी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आणखी वाचा : “माझं करिअर उद्ध्वस्त…” २०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने नोंदवला सुकेशविरोधात जबाब
अलिया भट्टचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच नेटफ्लिक्सने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या हॉलिवूडपटात गल गडॉट मुख्य भूमिकेत आहे. याच्या चित्रीकरणादरम्यानच आलिया गरोदर असल्याचं स्पष्ट झालं होतं.
आता मात्र या जोडप्यामध्ये ११ ऑगस्ट या दिवशी चांगलीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे पोस्टरसुद्धा नुकतंच प्रदर्शित झालं. तो चित्रपटसुद्धा याच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भले एक चित्रपट ओटीटीवर आणि एक चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असला तरी याचा परिणाम दोन्ही चित्रपटांवर होऊ शकतो. ‘अॅनिमल’ हा चित्रपट संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात रणबीरबरोबर रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.