बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. यापूर्वी हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता परंतु, काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, आता एका बंगाली अभिनेत्याने या चित्रपटाच्या पोस्टरवर कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “माझी माणसं…”, ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर गेला पावसाळी ट्रेकला, व्हिडीओत दिसली ‘या’ अभिनेत्रीची झलक

आयफाने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या वादाला सुरूवात झाली. आयफाने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर आगामी बॉलीवूड चित्रपटांचे पोस्टर्स त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘जवान’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ आणि ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटांचा यामध्ये समावेश होता. यामधील ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या पोस्टरमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेता विक्रम चॅटर्जीने यासंदर्भात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “उपाशी झोपलो, लोकांचे अपशब्द ऐकले अन्…”, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षमय प्रवास

अभिनेता विक्रम चॅटर्जी या पोस्टमध्ये लिहितो की, “प्रिय आयफा, मी पूर्ण विनम्रतेने सांगू इच्छितो की, तुम्ही शेअर केलेले ‘अ‍ॅनिमल’चे पोस्टर माझ्या ‘पारिया’ चित्रपटाचे असून फक्त माझ्याजागी रणबीर कपूरचा चेहरा लावला गेला आहे. मी रणबीरचा खूप मोठा चाहता असल्याने मला काही फरक पडत नाही पण, यामुळे त्याला नक्कीच फरक पडेल.”

हेही वाचा : दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री एकत्र गेल्या पावसाळी ट्रेकला; नेटकरी म्हणाले, “तुम्ही मैत्रिणी कधी झालात?”

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे प्रदर्शन सध्या १ डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor animal poster copied from bengali film says actor vikram chatterjee sva 00