बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर श्रद्धा कपूरबरोबर एका हलक्या फुलक्या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. सध्या हे दोघेही याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याबरोबरच सध्या जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायची हवासुद्धा सगळीकडेच बघायला मिळत आहे. नुकतंच व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने ‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’सारखे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते.

याबद्दल रणबीर कपूरने वक्तव्य केलं आहे. बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना आपल्या चित्रपटांपैकी कोणता पुन्हा प्रदर्शित करायला आवडेल याबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, “चित्रपट हे एक असं माध्यम आहे कि ते बरोबर त्याचा प्रेक्षक शोधतं. कदाचित आत्ता नाही पण १० वर्षांनी लोक तो चित्रपट आवडीने पाहतात. आज गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ किंवा राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटांबद्दल लोक भरभरून बोलतात, प्रशंसा करतात, पण हे दोन्ही चित्रपट तेव्हा जबरदस्त फ्लॉप ठरले होते. प्रत्येक चित्रपट त्याचं नशीब घेऊन येतो आणि त्यासाठी तो स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग शोधतोच.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

आणखी वाचा : ‘कुली’चं चित्रीकरण करताना मृत्यूच्या दाढेतून सुखरुप परतलेले अमिताभ बच्चन; ‘वैद्यकीयदृष्ट्या मृत’ केलं होतं घोषित

पुढे या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला, “जर मला पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी निवड करायची असेल तर मी ‘रॉकेट सिंग सेल्समन ऑफ द इयर’ या चित्रपटाची निवड करेन. तो फार रंजक चित्रपट होता अशातला भाग नाही, पण दरवेळी चित्रपट न चालण्याचा दोष प्रेक्षकांना देण्यात अर्थ नाही. त्यामुळे तो चित्रपट बनवतानाही आमचं कुठेतरी चुकलं असणारच म्हणूनच तो चित्रपट चालला नाही. आज जर मला रॉकेट सिंगसारखा चित्रपट करायचा असेल तर मी तो मोठ्या पडद्यासाठी नव्हे तर ओटीटीसाठी बनवेन.”

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून रणबीरने गेल्यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणबीर आणि श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच रणबीरच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. यातील रणबीरचा डॅशिंग लूक चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

Story img Loader