बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर नेहमी चर्चेत असतो. रणबीरच्या ‘तू झुठी में मक्कर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. रणबीर ऋषी कपूर यांचा मुलगा तर राज कपूर यांचा नातू आहे. कपूर घराण्यातील प्रत्येक पिढीने गेल्या अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. रणबीरला अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे अभिनय त्याच्या रक्तात भिनला आहे. मात्र, रणबीरने एके दिवशी ऋषी कपूर यांच्याकडून अभिनयाचा सल्ला मागितला होता. या सल्ल्यामुळे ऋषी कपूर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. खुद्द ऋषी कपूर यांनी तो किस्सा सांगितला होता.
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘आप की अदालत’मध्ये याबाबत खुलास केला होता. एके काळी रणबीरला गाण्यात लिपसिंक करताना त्रास होत होता. रणबीरने ऋषी कपूर यांना फोन केला आणि लिपसिंगबद्दल टिप्स मागितल्या. त्यावर ऋषी कपूर यांनी तू राज कपूरचा नातू आहेस, ऋषी कपूरचा मुलगा आहेस आणि तू मला हे विचारत आहेस? असा प्रतिप्रश्न केला होता.
ऋषी कपूर यांनी रणबीरला सांगितले की, जे ओरिजिनल वाटतं ते मोठ्या आवाजात कसं गाायचं. “मी त्याला इतक्या मोठ्या आवाजात गाण्यास सांगितले की तुझ्या सहकलाकाराला वाटेल की तू पूर्णपणे सुराच्या बाहेर आहेस. ऋषी म्हणाले की, अनेकदा त्यांच्यासोबत असे घडते जेव्हा त्यांचे सहकलाकार अनेकदा गाणे थांबवण्यास सांगायचे. “तुम्ही सेटवर जे गाता ते प्रेक्षक ऐकणार नाहीत. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी गात आहेत हे त्यांना माहीत आहे, पण एखादा अभिनेता गातोय असे दिसायला हवे.”
हेही वाचा- बॉलीवूडचे ‘करण-अर्जुन’ पुन्हा एकत्र; ‘टायगर ३’ मध्ये करणार जबरदस्त ॲक्शन
ऋषी कपूर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी १९७० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता.