रणबीर कपूर सध्या त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे. वडील झाल्यानंतर तो काही दिवस कामांमधून ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र रणबीर त्याच्या आगामी चित्रपटांचं चित्रीकरण करत आहे. आलिया भट्ट व लेकीला पुरेसा वेळ देत तो त्याचं काम करत आहे. ‘एनिमल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये रणबीर व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचाच रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “…अन् शेवटी आप्पा अंथरुणाला खिळले” निधनापूर्वी वडिलांची झालेली ‘ती’ अवस्था पाहून खचले होते संजय जाधव, सांगितला वेदनादायी प्रसंग

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

पंजाबमध्ये रणबीर या चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. तेथील चित्रीकरण संपल्यानंतर ‘एनिमल’च्या संपूर्ण टीमने जोरदार पार्टी केली. यावेळी रणबीरही तिथे उपस्थित होता. त्याने या पार्टीमध्ये अगदी धमाल केली. रणबीरचे पार्टीमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये रणबीर बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये छय्या छय्या या गाण्यावर अगदी जमिनीवर बसून नाचत आहे. रणबीरच्या या व्हिडीओला चाहत्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. रणबीरबरोबरच या व्हिडीओमध्ये त्याच्या चित्रपटाची इतरही टीम नाचत आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

रणबीरला डान्स करताना पाहून त्याची टीम त्याला प्रोत्साहन देत आहे. तसेच रणबीरचा बदलता लूक या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रणबीरची वाढलेली दाढी, बदलती शरीरयष्टी विशेष लक्षवेधी आहे. ‘एनिमल’ या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

Story img Loader