नुकताच ६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. गुजरातमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर सारा अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, विक्रांत मेस्सी, करीना कपूर या कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. या सोहळ्यादरम्यानचा रणबीरचा एक व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल झाला आहे.
या सोहळ्यात रणबीर ‘ॲनिमल’मधील ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करीत होता. तेवढ्यात त्याची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी आलिया भट्ट हिच्यावर गेली. आलियाला बघताच रणबीर स्टेजवरून खाली आला आणि त्याने आलियाबरोबर ‘जमाल कुडू’ची हूक स्टेप केली. आलिया व रणबीरच्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत दोघांचे कौतुक केले आहे.
कोणत्या कलकारांना मिळाला पुसरस्कार?
दरम्यान यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘ॲनिमल’ चित्रपटाला सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले आहेत. रणबीर कपूरला ‘ॲनिमल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. आलिया भट्टला रॉकी और राणी की प्रेम कहाणी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुसस्कार मिळाला. तर ‘ॲनिमल’मधील गाण्यासाठी भूपिंदर बब्बल यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा- हृतिक रोशनच्या ‘फायटर’चं ८० कोटींचं नुकसान; जाणून घ्या नेमकं कारण
रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी १ डिसेंबरला रणबीरचा ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना, अनिल कपूर व बॉबी देओलची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता लवकरच रणबीर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तर साऊथची अभिनेत्री सई पल्लवी सीतेची भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.