बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर गेली अनेक वर्ष तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या लूक्सने तो अनेकांना वेड लावत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक शर्टलेस फोटो व्हायरल होत होता. यातील त्याची शरीरयष्टी पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. परंतु यामागे मोठी मेहनत असल्याचं आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणबीर कपूरचा नुकताच ‘तू झूटी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याचा डॅशिंग अवतार दिसला. या चित्रपटासाठी त्याने त्याच्या शरीरावर बरीच मेहनत घेतली. या चित्रपटात त्याचे शर्टलेस शॉट्स आहेत. पण ही शरीरयष्टी कमावण्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागला आहे.

आणखी वाचा : Video: ….अन् आशुतोष राणांनी सर्वांसमोर राजकुमार रावच्या कानाखाली मारली, अभिनेत्याने केला खुलासा

रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी उत्तम शरीरयष्टी कमावण्यासाठी त्याने त्याच्या डायटमध्ये बराच बदल केला. त्याने त्याच्या आहारात बदल करून व्यायामावरही भर दिला. गेली अडीच वर्ष त्याने रोटी खाल्लेली नाही. त्याचबरोबर मसालेदार आणि तळलेले पदार्थ खानही त्याने बंद केलं. रणवीर नेहमी ग्लूटन फ्री आहार घेतो. म्हणजेच रोटी, पिझ्झा, पास्ता यांसारखे मैदा किंवा गव्हापासून बनवलेले पदार्थ तो खात नाही. तर त्याने त्याच्या आहारात एग व्हाईट, ब्राऊन राईस, ताज्या भाज्या, डाळी, प्रोटीन शेक यांचा समावेश अधिक करतो.

हेही वाचा : “…आणि लग्नानंतर सगळंच बदललं,” रणबीर कपूरने केला आलियाशी असलेल्या नात्याविषयी खुलासा

दरम्यान त्याचा आणि श्रद्धा कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या चित्रपटाने कमाईचा शंभर कोटींचा पल्लाही पार केला आहे.