रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘ॲनिमल’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची स्टारकास्ट लंडनमध्ये बरेच दिवस शूटिंग करत होती. तेथील शूटिंग पूर्ण करून रणबीर कपूर नुकताच आपल्या घरी परतला आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या सेटवरील सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आनंदाच्या भरात रणबीरने बॉबी देओलचे चुंबन घेतल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर चित्रपटाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रणबीर आणि बॉबीसमोर एक केक ठेवलेला दिसत आहे. बॉबीकडे सुरी आहे, तर रणबीर बॉबीला, ‘तू अद्भुत आहेस,’ म्हणत चुंबन घेत आहे. यानंतर बॉबी म्हणतो, ‘तू अद्भुत आहेस, पण सगळेच अद्भुत आहेत.’ यानंतर रणबीर आणि बॉबीने केक कापला आणि मागे उभे असलेले लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. यातील रणबीरच्या जबरदस्त लूकचे चांगलेच कौतुक होत आहे.

या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शुक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्र असेल, असा खुलासाही केला होता. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.