‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर अभिनेता रणबीर कपूर नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो आता ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तो दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच तिने तिचा रणबीरबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव शेअर केला. सेटवरचा अनुभव कसा होता यावर बोलताना तिने रणबीरच्या स्वभावाच्या काही गोष्टी उलगडल्या. रणबीरच्या एका कृतीमुळे तिला रडू आले होते असा खुलासा तिने केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : फरहान अख्तरची मेहुणी लवकरच झळकणार मराठी चित्रपटात, ‘या’ अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका मंदानाने हा अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले, “सेटवरचा नाश्ता करून मला कंटाळा आला होता. सेटवरचे जेवण फारसे चविष्ट नसल्याने मला ते आवडत नव्हते, परंतु नाहिलाज होता. मी एकदा गप्पा मारताना रणबीरला सांगितले की, सेटवरचे जेवण खूप कंटाळवाणे आहे. हे ऐकताच दुसऱ्याच दिवशी रणबीरने माझ्यासाठी त्याच्या स्वयंपाकीकडून तोच नाश्ता बनवला जो मी काल खाल्ला होता. रणबीरच्या कुकने बनवलेला नाश्ता खूप चविष्ट होता.” रणबीरची ही काळजी पाहून रश्मिका रडू लागली.

पुढे रश्मिका म्हणाली, “जेव्हा रणबीरने मला चविष्ट नाश्ता खाल्ल्यावर रडताना पाहिलं तेव्हा तो म्हणाला की, “रश्मिका, रोज हे बेचव पदार्थ तू का खातेस?” यावर मी रणबीरला सांगितले की, “तू भाग्यवान आहेस कारण तुझ्याकडे चांगला स्वयंपाकी आहे, पण मी तुझ्याइतकी भाग्यवान नाही. मी एक सामान्य माणूस आहे.” त्यासोबतच रणबीर खूप गोड आहे आणि तो रश्मिकाची खूप काळजी घेत असेही रश्मिकाने मुलाखतीदरम्यान सांगितले.

हेही वाचा : रश्मिका मंदानाने केली फॅनची ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडिओ झाला व्हायरल

इतकेच नाही मी तिचा प्रत्येक सीन झाल्यावर रश्मिका रणबीरला तिचा सीन कसा झाला हे विचारायची, त्यावर रणबीर तिला त्याचे मत सांगायचा. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि रश्मिका यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor made rashmika mandanna cry on set of animal rnv