Bollywood actor cried when Madhuri Dixit got married: बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’चे लाखो-करोडो चाहते आहेत. माधुरी दीक्षित तिच्या अभिनय व तसेच नृत्यांसाठी ओळखली जाते. हम आपके हैं कौन, मोहब्बत, कोयला, वजूद अशा अनेक चित्रपटांतील अभिनेत्रीच्या भूमिका गाजल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे फक्त सामान्य प्रेक्षकच नाहीत, तर बॉलीवूडमधील अनेक कलाकारही माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. नुकतीच अभिनेत्री भूल भूलैय्या ३ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यावेळी कार्तिक आर्यननेदखील माधुरी दीक्षित आणि विद्या बालनबरोबर काम केल्यानंतर आनंद व्यक्त केला होता. या सगळ्यात रणबीर कपूरचे एक जुने वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तेव्हा मी रडलो…
२०१३ मध्ये रणबीर कपूरने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने माधुरी दीक्षितबरोबर काम करण्याबाबत वक्तव्य केले होते. रणबीर कपूर म्हणाला होता की, मी माधुरीजींचा मोठा चाहता होता. मला आठवतं, जेव्हा त्यांचे लग्न झाले, तेव्हा मी रडलो होतो. पुढे रणबीर कपूर असेही म्हणाला होता की, जर मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर मजा येईल. रणबीर कपूर व माधुरी दीक्षित यांनी ये जवानी हैं दिवानी या चित्रपटात घागरा या गाण्यात एकत्र काम केले आहे.
रणबीर कपूरने मागील काही काळात विविध चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत त्याची ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूर बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. बऱ्याचदा तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याची पत्नी आलिया भट्ट हीदेखील नावाजलेली अभिनेत्री आहे. त्यांची लेक राहा तिच्या सुंदर दिसण्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अनेकदा नीतू कपूर व रिद्धिमा कपूर त्यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लव्ह अँड वॉर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत विकी कौशलदेखील दिसणार आहे. विकी कौशलचा छावा हा चित्रपट खूप गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. संजय लीला भन्साळींच्या लव्ह अँड वॉरमध्ये हे कलाकार कोणत्या भूमिकांत दिसणार आणि काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, माधुरी दीक्षित नुकतीच भूल भुलैय्या ३ मध्ये दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. चित्रपटांबरोबरच अभिनेत्री डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदीही दिसते. आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.