दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे सध्या त्यांच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट फारच हिंसक असणार याची कल्पना दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी आधीच एका मुलाखतीमध्ये दिली होती. ‘अ‍ॅनिमल’आधी संदीप यांनी दोन चित्रपट केले आहेत. ‘अर्जुन रेड्डी’ व त्याचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ अशा दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे.

‘अर्जुन रेड्डी’ चांगलाच हीट ठरला परंतु नंतर त्याचा रिमेक ‘कबीर सिंग’सुद्धा चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला. प्रेक्षकांनी शाहिद आणि कियारा या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. बऱ्याच डायलॉग आणि सीन्समुळे ‘कबीर सिंग’ वादाच्या भोवऱ्यातही सापडला, परंतु तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली. नुकतंच रणबीरने संदीप यांच्या ‘कबीर सिंग’विषयी भाष्य केलं आहे.

renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश

आणखी वाचा : “माझ्या बँक अकाऊंटमध्ये फक्त १८ रुपये…” विजय वर्माने सांगितला चित्रपटातून हकालपट्टीचा किस्सा

संदीप यांचा ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरणार अशी खात्री रणबीरला होती. ‘अ‍ॅनिमल’च्या निमित्ताने मीडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, “जेव्हा कबीर सिंगच्याही आधी मी अर्जुन रेड्डी पाहिला त्यावेळी मला असं वाटलं की यापेक्षा उत्कृष्ट लव्ह स्टोरी होऊच शकत नाही. त्यानंतर संदीप यांनी पुन्हा तीच गोष्ट कबीर सिंगच्या माध्यमातून मांडली. त्यावेळी मी म्हंटलं की मी पैज लावून सांगतो ही हा चित्रपट सुपरहीट होऊच शकत नाही, कारण अर्जुन रेड्डीमध्ये ज्या पद्धतीची कथा, संगीत, सादरीकरण होतं तसं पुन्हा घडुच शकत नाही. पण संदीपने ते करून दाखवलं.”

kabirsingh
फोटो : इंडियन एक्सप्रेस

संदीप यांच्या ‘कबीर सिंग’ ला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. काहींनी चित्रपट डोक्यावर घेतला तर काहींना ते पात्र न आवडल्याने त्यांनी जोरदार टीका केली. आता संदीप यांच्या ‘अ‍ॅनिमल’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाला सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळालेलं आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, तृप्ती दीमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ डिसेंबरला ‘अ‍ॅनिमल’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.