Ramayan movie release Date : रणबीर कपूर, यश, आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा पोस्टर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी आपल्या X (पूर्वीच ट्विटर) सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत या चित्रपटाच्या प्रदर्शना संबंधित सविस्तर माहिती दिली आहे. चित्रपटाच्या तारखेची घोषणा करताना त्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राईझ दिल आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi), आणि यश (Yash) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असून रणबीर कपूर या सिनेमात श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून ‘केजीएफ’ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून या सिनेमाच्या तारखेची घोषणा करताना निर्मात्यांनी प्रेक्षकांना सरप्राईझ दिलं आहे.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरीस पराभूत!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Happy Birthday Raha alia ranbir daughter
२ वर्षांची झाली राहा कपूर! वाढदिवशी आजीने शेअर केला लाडक्या नातीचा गोंडस फोटो; आत्याची सुद्धा खास पोस्ट
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांची काय आहे स्थिती? वाचा आकडेवारी!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश

हेही वाचा…२ वर्षांची झाली राहा कपूर! वाढदिवशी आजीने शेअर केला लाडक्या नातीचा गोंडस फोटो; आत्याची सुद्धा खास पोस्ट

‘रामायण’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर

रामायण चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाचे एक नाही तर दोन भाग येणार आहे अस जाहीर केलं आहे. हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असल्याचं मानलं जात आहे. या सिनेमाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सिनेमाचं पोस्टर एक्सवर पोस्ट करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “दहा वर्षांपूर्वी मी या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाने या प्रवासाला सुरुवात केली. आज मला आनंद होतोय की आमचा हा प्रयत्न सुंदररीत्या आकार घेत आहे. आमची संपूर्ण टीम त्यासाठी अविरत मेहनत करत आहे. आपल्या इतिहासाचं आणि आपल्या संस्कृतीचं सर्वांत प्रामाणिक सादरीकरण करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. पुढे नमित यांनी लिहिलं, “तुम्ही सर्वांनी आमच्या या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार व्हा – आपल्या महान महाकाव्याचं अभिमानाने आणि श्रद्धेने सादरीकरण करण्यासाठी आमच्या ‘रामायण’ परिवारात सामील व्हा.”

हेही वाचा…‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेनची’ टक्कर टाळण्यासाठी भूषण कुमार यांनी घेतली होती अजय देवगणची भेट, पण…

या पोस्टरवर कलाकारांची नावे देण्यात आलेली नाहीत; मात्र पोस्टरवर चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांचे नाव आणि सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखांचा उल्लेख आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या राम आणि सीता यांच्या वेशभूषेतील व्हायरल झालेल्या काही छायाचित्रांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. अरुण गोविल आणि लारा दत्ता यांचेसुद्धा या सिनेमातील फोटोज व्हायरल झाले होते. ते दोघे या फोटोत राजेशाही वेशभूषेत दिसत असून, राजा दशरथ आणि राणी कैकयी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा…नोरा फतेहीने आयटम साँगसाठी लहान ब्लाउज घालण्यास दिला होता नकार; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “मला मादक…”

‘इंडिया टुडे’ने काही दिवसांपूर्वी दिलेल्या अहवालानुसार, ‘रामायण’ सिनेमाचे तीन भाग येणार आहेत. या महाकाव्याच्या पहिल्या चित्रपटात राम आणि सीतेच्या कथेसह सीता अपहरणापर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. दुसऱ्या भागात सीता अपहरण आणि हनुमानाची कथा आणि रामाची हनुमानाशी भेट दाखवली जाणार आहे. तिसरा आणि शेवटचा चित्रपट सीतेच्या अपहरणानंतरच्या घटकांवर आधारित असेल. चित्रपटाच्या तीन भागांचं चित्रीकरण एकाच वेळी होणार आहे.

हेही वाचा…श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन

यश दिसणार रावणाच्या भूमिकेत

‘हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत यशने रावणाच्या भूमिकेबद्दल सांगितलं, “रावण हे एक अतिशय आकर्षक पात्र आहे. या भूमिकेमुळे मी खूप उत्साही आहे. रामायणात, जर मला कुणी दुसरी कोणती भूमिका साकारायला सांगितलं असत, तर कदाचित मी नकार दिला असता. माझ्यासाठी, रावण हे पात्र सर्वांत रंजक आहे. या भूमिकेतील विविध शेड्स मला खूप आकर्षक वाटतात. या पात्राला एक वेगळी दृष्टी देऊन सादर करण्यास उत्तम वाव आहे, आणि त्यामुळं मला खूप आनंद आहे.”