Alia Bhatt And Ranbir Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांना आजच्या घडीला बॉलीवूड विश्वातील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. परंतु, सुरुवातीला या दोघांना वयात असलेल्या अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्यात आलिया-रणबीरने एकमेकांना खंबीरपणे साथ दिली अन् २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. एप्रिल २०२२ मध्ये आलिया-रणबीरचा विवाहसोहळा राहत्या घरी पार पडला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी झाला. ती आता ३१ वर्षांची आहे. तर, रणबीर कपूरचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. आता तो ४२ वर्षांचा होईल. दोघांच्या ( Alia Bhatt And Ranbir Kapoor ) वयात जवळपास ११ वर्षांचं अंतर आहे. याबद्दल निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने भाष्य केलं आहे.

रणबीर ( Alia Bhatt And Ranbir Kapoor ) म्हणाला, “मी माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीशी लग्न केलंय याचा मला प्रचंड आनंद आहे. आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र गप्पा मारतो, हसतो, चुगल्या करतो…अजून काय हवं? ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी खरंच खूप जास्त नशीबवान आहे.”

हेही वाचा : ठरलं तर मग : मायलेकींचं प्रेम! प्रतिमासाठी सायली गाणार अंगाई; पूर्णा आजीचे डोळे पाणावले, मालिकेत पुढे काय घडणार?

रणबीर – आलियाची पहिली भेट केव्हा झाली? ( Alia Bhatt And Ranbir Kapoor )

“आलियाचं एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. तिने माझं आयुष्य खऱ्या अर्थाने उजळून टाकलंय. ती माझ्यापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे आणि एक हास्यास्पद गोष्ट तुम्हाला सांगतो. मी आलियाला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ती फक्त ९ वर्षांची होती. ती ९ वर्षांची अन् मी २० वर्षांचा होतो…आम्ही एक फोटोशूट एकत्र केलं होतं. त्यावेळी संजय लीला भन्साळी बालविवाह या सामाजिक विषयावर आधारित ‘बालिका वधू’ चित्रपट बनवणार होते. तेव्हाच आमची पहिली भेट झाली होती. आता त्या गोष्टी आठवल्या की विचित्र वाटतात.” असं रणबीरने सांगितलं.

आलिया भट्ट व रणबीर कपूर Alia Bhatt And Ranbir Kapoor

हेही वाचा : Video : Bigg Boss वहिनीचं तरी ऐका! घरात वाहू लागले प्रेमाचे वारे; निक्की तांबोळी अन् अरबाजची जोडी जमणार का?

आलियाबद्दल सांगताना रणबीर पुढे म्हणाला, “ती प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. तिचा करिअरवर पूर्णपणे फोकस असतो. याशिवाय आमच्या वैयक्तिक आयुष्यात नातं जपण्यासाठी आलिया प्रचंड मेहनत घेते. तिने माझ्यासाठी स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत हे मी मान्य करतो आणि मी सुद्धा तिच्यासाठी हळुहळू बदलतोय.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor reaction on 11 year age gap with alia bhatt and talking about their married life sva 00