अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची मोठी चर्चा चालू होती. जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक नामांकित व्यक्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. बॉलीवूडच्या कलाकारांपासून ते हॉलीवूडच्या कलाकारापर्यंत सगळेजण या लग्नाला उपस्थित होते. अनंत-राधिका आणि अंबानी कुटुंबाबरोबरच उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनीदेखील लक्ष वेधून घेतले होते. आता बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Somebody gave their business card to Ranbir ??#RanbirKapoor pic.twitter.com/hOTjUnselF
— Spirit crown??↕️ (@Crown_Kapoor) July 12, 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टबरोबर पोहचला होता. या सोहळ्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. एक व्यक्ती रणबीर कपूर यांच्या हातात हात देऊन बोलायला सुरूवात करतो, त्यानंतर तो रणबीरच्या कानात काहीतरी सांगतो. पुढचा काही वेळ त्यांचे बोलणे सुरू असते. शेवटी, तो व्यक्ती रणबीरला त्याचे बिझनेस कार्ड देतो. या संपूर्ण संभाषणादरम्यान रणबीर कपूर त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे, स्मितहास्यासहित ऐकत असतो. त्याने ते कार्डदेखील सभ्यपणे स्विकारल्याचे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे. आता हा व्यक्ती कोण होता, याचा अंदाज नेटकरी लावताना दिसत आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
एक्सवर ‘कोणीतरी रणबीरला त्याचे बिझनेस कार्ड दिले’, असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता त्यावर चाहत्यांनी ती व्यक्ती कार्ड देताना काय म्हणाली असेल याचे अंदाज बांधत मजेशीर कमेंट केल्या आहेत. “ही व्यक्ती हलवाई असणार. वाढदिवस, मुंडन, सगळ्या कार्यक्रमासाठी आम्ही स्वादिष्ट पदार्थ बनवतो, हे माझे कार्ड. असं त्या व्यक्तीने म्हटलं असेल,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी हे खूप सामान्य आहे. चित्रपटांतील कलाकारांपेक्षा अनेक लोक खूप श्रीमंत असतात. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, जाहिरातीच्या शूटिंगसाठी ये, असं तो असं तो व्यक्ती म्हणाला असणार. तर एका नेटकऱ्याने “या कार्यक्रमात कोणी सामान्य लोक नव्हते, प्रत्येकजण त्यांच्या क्षेत्रात उत्तर काम करणारे होते आणि त्यामुळेच त्यांना या सोहळ्यासाठीचे आमंत्रण मिळाले होते. हा व्यक्ती कोणीतरी गुंतवणूक सल्लागार असणार आहे. ज्या लोकांना वाटते हे सर्व लोक तिथे आनंद साजरा करण्यासाठी आले आहेत ते मूर्ख आहेत. आपले संबंध वाढवून आपला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हे लोक अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी जमतात. असे त्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने, “रणबीर २०२५मध्ये विमल पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसेल.” अशी मजेशीर कंमेट केली आहे.
हेही वाचा : “अभिषेक बच्चनने तर…”; ऐश्वर्या राय अनंत-राधिकाच्या लग्नात बच्चन कुटुंबाबरोबर न आल्याने नेटकऱ्यांच्या कमेंट्स
दरम्यान, अनंत- राधिकाचा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्यासाठी रणबीर कपूरने शेरवानी परिधान केली होती.