बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच निमित्ताने रणबीरने नेटफ्लिक्सच्या ‘ऑकवर्ड इंटरव्ह्यू’मध्ये हजेरी लावत अनेक खुलासे केले आहेत. रणबीरचा या मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये रणबीर कपूर हा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नामधील काही प्रसंग हुबेहूब रिक्रिएट करून दाखवीत आहे.

हेही वाचा : “आधी मित्रांना ब्रेकअपविषयी सल्ला द्यायचो, पण…” रणबीर कपूरने सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाला…

Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”
rang maza vegala team attends shivani sonar and ambar ganpule wedding
Welcome सुनबाई…! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची टीम पोहोचली शिवानी-अंबरच्या लग्नाला; नवरा-नवरीसह काढला झकास सेल्फी

सिद्धार्थ-कियाराने त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाल्यावर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये कियाराची एन्ट्री झाल्यावर सिद्धार्थ आपल्या घड्याळाकडे पाहून किती वेळ झाला? असा इशारा करताना दिसतो. याचप्रमाणे रणबीरने सुद्धा मुलाखतीदरम्यान हे प्रसंग अगदी हुबेहूब रिक्रिएट केले आहेत.

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि अनुष्काला बाईक राईड पडणार महागात, व्हायरल व्हिडीओवर मुंबई पोलिसांनी केलेले ट्वीट चर्चेत

नेटफ्लिक्सच्या ‘ऑकवर्ड इंटरव्ह्यू’मध्ये यूट्यूबर ऐश्वर्या मोहनराज ही रणबीरला तू इन्स्टाग्रामवर शेवटची रील्स कोणती पाहिली? असे विचारते यावर रणबीर मी राहासाठी लहान मुलांचे व्हिडीओ बघत असतो असे म्हणाला. यानंतर ऐश्वर्या ही सिद्धार्थ-कियाराने पोस्ट केलेला लग्नाचा व्हिडीओ छान होता ना, असा प्रश्न अभिनेत्याला विचारते, यावर रणबीर “ते दोघे एकत्र सुंदर दिसतात आणि खूप छान आहेत…” असे म्हणतो आणि दोघे मिळून संपूर्ण सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील काही प्रसंग हुबेहूब रिक्रिएट करताना दिसतात.

दरम्यान, रणबीर कपूर लवकरच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करीत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader