बॉलीवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील नेहमीच चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटींची विविध शहरांमध्ये घरं, फार्म हाऊस असतात. तर वरचेवर ते त्यांच्या प्रॉपर्टीची खरेदी विक्री ही करत असतात. यापैकीच एक म्हणजे रणबीर कपूर. आता नुकताच त्याने त्याचं पुण्यातील घर भाड्याने दिलं आहे.
रणबीर मुंबईत त्याच्या कुटुंबियांबरोबर राहतो. तर त्या व्यतिरिक्त आलिया आणि रणबीरने मिळून मुंबईत एक नवीन आलिशान घरही घेतलं आहे. सध्या त्यांच्या या नवीन घराचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे काही वर्षांपूर्वी त्याने पुण्यात घर घेतलं होतं. ते पुण्यातील त्याचं आलिशान घर आता नुकतंच त्याने भाड्याने दिलं आहे.
पुणे येथील ट्रम्प टॉवरमध्ये त्याचा आलिशान फ्लॅट आहे. या बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर त्याचं हे घर आहे. तर हे त्याचं घर त्याने Duro Shocks Pvt. Ltd ला भाड्याने दिलं आहे. या घराचा कार्पेट एरिया ६०९४ स्क्वेअर फुट आहे. रणबीरने Duro Shocks Pvt. Ltd ला या घरासाठी आकारलेलं भाडं तब्बल ४ लाख प्रति महिना आहे.
हेही वाचा : दुर्गा पूजेदरम्यान अचानक कतरिना आली समोर अन् तो…, ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर झाला ट्रोल
Duro Shocks Pvt. Ltd ने रणबीर कपूरला डिपॉझिट म्हणून 24 लाख रुपये दिले आहेत. तर त्यांच्यातील हा करार तीन वर्षाचा आहे. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्यात हा करार झाला आहे.