रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. मुलगा व वडिलांचं नातं, त्या नात्यातील चढ-उतार आणि रक्तपात ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर व संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. ते चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अशातच रणबीर कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुलासा केला की राहाचा जन्म अॅनिमलच्या शूटिंगदरम्यान झाला होता.

अभिनय सोडून केली शेती, चार वर्षांची मेहनत पुरात वाहून गेल्याने अभिनेता झाला कर्जबाजारी, म्हणाला, “मी २० एकर…”

नुकताच दिल्लीत ‘अॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉबी देओल, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि निर्माता भूषण कुमार देखील उपस्थित होते. रणबीर कपूर पूर्ण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिथे पोहोचला होता. यावेळी मीडियाशी बोलताना रणबीर म्हणाला, “मी या चित्रपटाचं शूटिंग करत असताना माझी मुलगी राहा हिचा जन्म झाला. पण मी आधी शूटिंग केले आणि नंतर घरी जाऊन तिला पाहिलं.”

प्रसिद्ध अभिनेत्रीने २० वर्षांनी सांगितलं सिनेसृष्टी सोडण्याचं कारण; म्हणाली, “चित्रपटाच्या अभिनेत्याने मला त्याच्या खोलीत…”

रणबीरने खुलासा केला की अशी हिंस्त्र भूमिका करूनही तो त्याच्या पात्राचा वैयक्तिक आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जसा आहे, तसाच तो कुटुंबाला जाऊन भेटतो. “मी एक वेगळी व्यक्ती आहे. मी माझ्या भूमिका कधीही घरी नेत नाही. हेच माझ्या कुटुंबासाठी चांगलं आहे. मी घरी जाऊन असं वागलो असतो, तर माझ्या बायकोने मला मारलं असतं,” असं रणबीर म्हणाला.

रणबीर कपूर पुढे म्हणाला, “‘अॅनिमल’च्या शूटिंगदरम्यान मी संदीप रेड्डी सरांना एकच प्रश्न विचारायचो की मला या सीनचे काहीतरी संदर्भ द्या. कारण ही भूमिका करताना मला माझ्या वडिलांची खूप आठवण आली. माझे वडील खूप तापट आणि उत्कट होते. त्यांनाच डोळ्यांसमोर ठेवून मी चित्रपटात अशी भूमिका साकारली आहे.”