बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला रणबीर?

निखिल कामतच्या युट्यूब पॉडकास्टला रणबीरने मुलाखत दिली असून त्या मुलाखतीचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये त्याने अनेक खासगी गोष्टींचा उलगडा केल्याचे दिसत आहे. रणबीरने आपले वडिलांबरोबर म्हणजेच ऋषी कपूरबरोबर कसे नाते होते, हे सांगितले आहे. तो म्हणतो की, माझ्या वडीलांशी असहमती दर्शवण्याची माझी कधीच हिम्मत झाली नाही. माझ्या बालपणी, मी कधीच त्यांच्या डोळ्यांचा रंग बघितला नाही. मी कायम त्यांच्यासमोर खाली मान घालून असायचो. माझे वडील खूप चांगले होते पण त्यांना लगेच राग यायचा. मी त्यांना कोणत्याही गोष्टीला कधीच नाही म्हटले नाही. पुढे त्याने स्वत:विषयी बोलताना म्हटले की, मला स्वत:च्या भावना उघडपणे सांगता येत नाहीत. असे नाही की मला व्यक्त व्हायचे नाही किंवा थेरपीच्या विरुद्ध आहे मात्र मला स्वत:ला इतरांसमोर व्यक्त व्हायला भीती वाटते.

रणबीरने याच मुलाखतीत आपण दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि तीच माझी ओळख बनली होती. माझ्या आयुष्यातला खूप मोठा मी काळ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो अशी माझी प्रतिमा झाली आणि आतादेखील ती काही प्रमाणात आहे. दरम्यान, रणबीर कपूर हा दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर नात्यात होता. दीपिकाने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात रणबीरबद्दल काही विधाने केली होती. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

हेही वाचा: लेन्स घातल्या, त्रास झाला, मग दिसायचंच बंद झालं- जस्मिन भसीनचा धक्कादायक अनुभव

राहाच्या जन्माबद्दल बोलताना त्याने म्हटले आहे की, राहाचा जन्म म्हणजे कोणतरी तुमचे हृदय बाहेर काढून तुमच्या हातात ठेवल्यासारखे आहे. राहा आलियाला तिचा एक भाग समजते. जेव्हा तिला मजा मस्ती करायची असते, त्यावेळी तिला मी पाहिजे असतो. दरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ ला लग्नगाठ बांधल्यानंतर देखील त्याच्यावर बरीच टीका झाली होती. नुकतीच ही जोडी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला पोहोचली होती, त्यावेळी त्यांनी पापाराझींसाठी पोझदेखील दिली. आता या युट्यूब पॉडकास्टचा संपूर्ण भाग प्रदर्शित झाल्यानंतर रणबीरने आणखी कोणत्या गोष्टींचा खुलासा केला आहे, हे समजणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor reveals identity became casanova after dating 2 successful actress of bollywood nsp