इलेक्ट्रिक बाईकवरून शहरात फिरताना एक अभिनेता स्पॉट झाला आहे. वांद्रे भागात हा अभिनेता बाईकवर फिरताना दिसला. काही जण त्याला ओळखू शकले, मात्र काहींना त्याला ओळखता आलं नाही. तर, हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीच नसून नुकताच बाबा झालेला रणबीर कपूर आहे.

रणबीरने त्याच्या बांधकामाधीन असलेल्या घराला भेट दिली. ही ई-बाईक चालवताना त्याने टोपी आणि मास्क घातलं होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये, रणबीर त्याच्या ई-बाईकवर एका बांधकामाधीन साइटवर पोहोचला आणि फेरफटका मारताना दिसतोय.

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आणि आलियाच्या घराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागतील. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “संपूर्ण घराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागतील. मात्र, पहिल्या ५ अपार्टमेंट्सचं बांधकाम सुरू आहे. टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंट जवळजवळ तयार आहेत. पहिले दोन अपार्टमेंट्स हे रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचे आहेत, असं म्हटलं जातंय.”

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी ६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. दोघांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं. या जोडप्याने सोशल मीडियाद्वारे ही बातमी जाहीर केली आणि अलीकडेच त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं. नीतू कपूर यांनी नातीचं नाव राहा कपूर असं ठेवलं आहे.

Story img Loader